India Corona Cases Today : गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 3.26 लाख नव्या रुग्णांची भर तर 3890 जणांचा मृत्यू
जगातील दरदिवशी वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येपैकी अर्धी रुग्णसंख्या ही भारतात वाढते, तर प्रत्येकी तिसरा मृत्यू हा भारतात होतो.
नवी दिल्ली : देशातील कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यूदरात अजूनही वाढ सुरुच आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 3,26,098 नव्या रुग्णसंख्येची भर पडली असून 3890 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचवेळी 3,53, 299 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही ताजी आकडेवारी जाहीर केली आहे.
शुक्रवारपर्यं देशात 18 कोटी 4 लाख 57 हजार 579 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. शुक्रवारी एकाच दिवसात 11 लाख 3 हजार 625 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आतापर्यंत 31.30 कोटीहून जास्त कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशातील आजची कोरोना स्थिती :
- एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 43 लाख 72 हजार 907
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 4 लाख 32 हजार 898
- एकूण सक्रिय रुग्ण : 36 लाख 73 हजार 802
- कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 66 हजार 207
- देशातील एकूण लसीकरण : 18 कोटी 4 लाख 57 हजार 579
राज्यातील स्थिती
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. शुक्रवारी 53,249 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 39,923 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 47,07,980 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.68 टक्के एवढे झाले आहे.
राज्यात शुक्रवारी 695 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5% एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,06,02,140 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5309215 (17.35 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 34,82,425 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 28,312 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात शुक्रवारी एकूण 519254 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Cyclone Tauktae : महाराष्ट्रासह देशातील 'या' राज्यांतही चक्रीवादळामुळं सतर्कतेचा इशारा
- Cyclone Tauktae : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहून मनुष्यबळ, साधनसामुग्री तयार ठेवा; मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना
- Corona Vaccination : कोरोना लसीकरणाबाबत ग्रामीण- आदिवासी भागात गैरसमज; जनजागृतीची नितांत गरज