India Corona Updates : 11 दिवसांनी मृतांच्या आकड्यात घट, देशात 24 तासांत 375 रुग्णांचा मृत्यू
India Corona Updates : गेल्या 24 तासांत 34 हजार 457 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 375 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
India Coronavirus Updates : भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावात घट झाली आहे. शनिवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 34 हजार 457 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. अशातच 375 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या देशात 3 लाख 61 हजार 340 सक्रिय रुग्ण आहेत. हा 151 दिवसांतील सर्वात कमी आकडा आहे.
11 दिवसांनी मृतांचा आकड्यात घट झाल्याचं पाहायला मिळालं. कोरोनामुळे आतापर्यंत 4.33 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये काल दिवसभरात 57 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
देशातील सध्याची कोरोनास्थिती :
कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 23 लाख
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 15 लाख
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 55 हजार
एकूण मृत्यू : चार लाख 33 हजार
राज्यात काल (शुक्रवारी) 4,365 नव्या कोरोनाबाधितांची भर तर 105 जणांचा मृत्यू
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. काल (शुक्रवारी) 4,365 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 हजार 384 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 21 हजार 305 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.97टक्के आहे.
राज्यात काल (शुक्रवारी) 105 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 37 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 55 हजार 454 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जळगाव (38), नंदूरबार (0), धुळे (6), परभणी (15), हिंगोली (77), नांदेड (44), अमरावती (89), अकोला (20), वाशिम (7), बुलढाणा (29), यवतमाळ (9), वर्धा (6), भंडारा (4), गोंदिया (2), गडचिरोली (30) या सोळा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12, 558 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
भिवंडी निजामपूर, धुळे, परभणी, लातूर, अकोला, यवतमाळ, वाशिम, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर अहमदनगरमध्ये सर्वाधिक 577 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 19,21, 798 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,15, 935 (12.36 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,22,221 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2, 745 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 223 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 223 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 322 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,19,381 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2,853 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 2052 दिवसांवर गेला आहे.