India China Row : चीनची आगळीक सुरूच, एलओसीवर लढाऊ विमानांचे उड्डाण
India China Row : गेल्या तीन ते चार आठवड्यांत चीनी विमाने नियमितपणे LAC च्या जवळून उड्डाण करत आहेत. भारतीय हवाई दलाचे जवानही मोठ्या जबाबदारीने चीनच्या कारवायांवर लक्ष ठेवून आहेत आणि परिस्थितीला उत्तर देत आहेत.
India China Row : भारताविरोधात चीनची आगळीक अजून सुरूच आहे. चीन आणि भारत यांच्यातील कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेनंतरही ड्रॅगनची लढाऊ विमाने पूर्व लडाखमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्य दलांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनची लढाऊ विमाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) उड्डाण करत आहेत. गेल्या तीन ते चार आठवड्यांत चीनी विमाने नियमितपणे LAC च्या जवळून उड्डाण करत आहेत. भारतीय हवाई दलाचे जवानही मोठ्या जबाबदारीने चीनच्या कारवायांवर लक्ष ठेवून आहेत आणि परिस्थितीला उत्तर देत आहेत.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, J-11 सह अनेक चिनी लढाऊ विमाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ उड्डाण करत आहेत. अलीकडच्या काळात या भागात 10-किमी कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर (CBM) लाईनचे उल्लंघन केल्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, भारतीय वायुसेनेने या चिथावणीला उत्तर देण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. भारताने मिग-29 आणि मिराज 2000 यासह सर्वात शक्तिशाली लढाऊ विमाने तळांवर तैनात केली आहेत.
चिनी विमानांच्या धोक्याचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दल आपली लढाऊ विमाने तैनात करत आहे. परंतु लडाख सेक्टरमध्ये भारतीय हवाई दलाच्या पायाभूत सुविधांच्या बांधकामावर पीपल्स लिबरेशन आर्मी तणावाखाली असल्याचे दिसते. या पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे भारतीय हवाई दलाचे कर्मचारी त्यांच्या नियंत्रणाखालील भागात चिनी हालचालींवर बारीक नजर ठेवू शकतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दल चीनच्या हालचालींना कॅलिब्रेटेड पद्धतीने प्रत्युत्तर देत आहे. चीनने एप्रिल-मे 2020 मध्ये LAC वरील स्थिती एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न केल्यानंतर लडाखमधील लष्करी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी भारत देखील वेगाने काम करत आहे.
चीनच्या लढाऊ विमानांनी 24 आणि 25 जूनच्या दरम्यान पूर्व लडाखमध्ये भारतीय सैनिकांच्या अगदी जवळून उड्डाण केले. 17 जुलै रोजी दोन्ही देशांमधील कॉर्प्स कमांडरच्या चर्चेदरम्यान हा मुद्दा चर्चेसाठी मांडण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या