Independence Day : 700 AI कॅमेरे, 10 हजारांहून अधिक पोलिस, शार्पशूटर; स्वातंत्र्यदिनी अशी असेल दिल्लीची सुरक्षा
Independence Day 2024 News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर व्हीव्हीआयपी पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी स्नायपर, SWAT कमांडो आणि शार्पशूटर तैनात केले जातील.
Delhi Security Arrangements For 15 August : दिल्लीत 15 ऑगस्टच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात असून त्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी या कार्यक्रमासाठी 3,000 वाहतूक पोलिस अधिकारी, 10,000 पोलिस कर्मचारी आणि 700 कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित चेहरा ओळखणारे कॅमेरे तैनात करून सुरक्षा वाढवली आहे.
जाणून घेऊया सुरक्षेबाबत काय विशेष व्यवस्था करण्यात आली आहे,
- आयजीआय एअर पोर्ट, रेल्वे स्थानके, बस स्टँड, मॉल्स आणि बाजारपेठांसह विविध ठिकाणी अतिरिक्त पोलिस दल आणि निमलष्करी दल तैनात.
- वाहतूक नियंत्रणासाठी तीन हजारांहून अधिक वाहतूक पोलिस तैनात करण्यात येणार आहेत.
- राष्ट्रीय राजधानीतील प्रमुख जंक्शनवर आणि लाल किल्ल्याला सीमेला जोडणाऱ्या रस्त्यांवरही वाहतूक पोलिस तैनात केले जातील.
- लाल किल्ल्यावर अनेक पातळ्यांवर सुरक्षा व्यवस्था असणार आहे. 700 AI-आधारित फेशियल रिकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे किल्ल्याच्या परिसरात बसवले जातील.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करतील तेव्हा या मुघलकालीन किल्ल्यावर 10,000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातील.
- लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी येणाऱ्या लोकांची ओळख पडताळून पाहण्यासाठी पोलिस स्मार्टफोन आधारित ॲप्लिकेशन देखील वापरणार आहेत.
- पंतप्रधान आणि इतर व्हीव्हीआयपी पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी स्नायपर, SWAT कमांडो, शार्पशूटर तैनात केले जातील.
- लाल किल्ल्यावर सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतील हल्ल्याची चर्चा झाली आणि दिल्लीचे पोलिस आयुक्त संजय अरोरा यांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यावर भर दिला.
- दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी ISIS च्या पुणे मॉड्यूलचा सदस्य असलेल्या एका वाँटेड दहशतवाद्याला अटक केली.
- हॉटेल, गेस्ट हाऊस, पार्किंग लॉट आणि रेस्टॉरंटची तपासणी केली जात असून भाडेकरू आणि नोकरांची पडताळणी केली जात आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त कडेकोट सुरक्षा व्यवस्था
पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलिस उपायुक्त (उत्तर) मनोज कुमार मीना यांनी सांगितले की, स्थानिक रहिवासी आणि मार्केट वेल्फेअर असोसिएशनसोबतही बैठका घेतल्या जात आहेत. डीसीपी पुढे म्हणाले की, 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या 20,000 ते 22,000 हून अधिक पाहुण्यांसाठी पोलिस विस्तृत सुरक्षा व्यवस्था करत आहेत. मेट्रोचे सर्व दरवाजे उघडे राहणार आहेत. 24 तास पायी गस्त, सामुदायिक जागरुकता आणि मॉक ड्रिलचेही आयोजन केले जात आहे.
ही बातमी वाचा: