पंतप्रधानांच्या उपस्थितीत अयोध्येत रचला जाणार दीपोत्सवाचा नवा इतिहास; काय आहे हा कार्यक्रम
Deepotsav 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी दीपावलीच्या पूर्वसंध्येला 23 ऑक्टोबर रोजी अयोध्येला भेट देणार आहेत.

Deepotsav 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी दीपावलीच्या पूर्वसंध्येला 23 ऑक्टोबर रोजी अयोध्येला भेट देणार आहेत. संध्याकाळी पाच वाजताच्या सुमाराला पंतप्रधान, भगवान श्री रामलल्ला विराजमान यांचे दर्शन घेतील आणि पूजा करतील. त्यानंतर ते श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राची पाहणी करतील. सायंकाळी पावणेसहा वाजता ते भगवान श्रीरामाचा प्रतिकात्मक राज्याभिषेक करतील. संध्याकाळी साडेसहाच्या सुमाराला पंतप्रधान, सरयू नदीच्या किनारी नवीन घाटावर आयोजित आरतीमध्ये सहभागी होतील. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते भव्य दीपोत्सव सोहळ्याचा शुभारंभ होईल. पंतप्रधान सरयू नदीवरच्या नवीन घाटावर आयोजित आरतीमध्ये सहभागी होणार आहेत.
दीपोत्सवाचे यंदाचे सहावे वर्ष आहे. पंतप्रधान पहिल्यांदाच या उत्सवात व्यक्तिश: सहभागी होणार आहेत. या उत्सवात 15 लाखांपेक्षा जास्त दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. दीपोत्सवादरम्यान विविध राज्यांतील विविध नृत्यप्रकारांबरोबरच पाच अॅनिमेटेड चित्ररथ आणि रामलीलेवर आधारित अकरा चित्ररथही प्रदर्शित केले जाणार आहेत. सरयू नदीच्या किनारी राम की पायडी येथे आयोजित भव्य म्युझिकल लेझर शो बरोबरच थ्री-डी होलोग्राफिक प्रोजेक्शन मॅपिंग शो ला सुद्धा पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. आयोध्यामध्ये होणाऱ्या भव्य दिव्य दिपोत्सवाबद्दल 10 ठळक मुद्यांमध्ये समजून घेऊ...
1. राम पौडी आणि परिसरात 22 हजार पेक्षा जास्त स्वयंसेवक 15 लाख दिप प्रज्वलीत करणार आहेत.
2. दीपोत्सवच्या आयोजकांनी सांगितलं की, 256 दिव्यांचा चौक तयार करतील.. दोन चौकामधील अंतर तीन फूट असेल.
3. लेजर शो, 3डी होलोग्राफिक प्रोजेक्शन मॅपिंग शो आणि आतिशबाजीही होणार आहे.
4. रामलीलाच्या मंचावर भारतामधील विविध राज्यासोबत रशिया आणि अन्य देशातील सांस्कृतिक दल भाग घेतील.
5. राम कथा पार्कमध्ये भगवान राम, देवी सीता, लक्ष्मण आणि भगवान हनुमान यांना पुष्पक विमानातून उतरताना दाखवण्यात येणार आहे.
6. सरयू नदीवरच्या नवीन घाटावर आरतीही होणार आहे. या आरतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
7. राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, "23 ऑक्टोबर रोजी रविवार असल्यामुळे राम ललाला लाल-गुलाबी पोशाखात तुम्ही पाहाल."
8. दिवाळीच्या दिवशी राम मदिरात पूजा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आयोध्यात येणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राची पाहणी करणार आहेत.
9. सायंकाळी साडेसहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरयू नदीच्या घाटावर आरती करणार आहेत. त्यानंतर त्यांच्या हस्ते भव्य दीपोत्सव समारंभाचा शुभारंभ होणार आहे.
10.दीपोत्सवादरम्यान काही राज्यांतील पाच अॅनिमेटेड फ्लोट्स आणि 11 रामलीला सादर केल्या जाणार आहेत. यामध्ये विविध राज्यांचे नृत्यप्रकार आणि कला सादर करण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
