Coronil औषधा संदर्भातील बाबा रामदेव यांचा दावा खोटा, IMA ने आरोग्यमंत्र्यांकडे मागितले स्पष्टीकरण
योगगुरू रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने कोरोनील (Coronil) हे औषध कोरोनावर असल्याचा दावा खोटा असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे.
नवी दिल्ली : पतंजलीच्या कोरोनिल (Coronil) टॅबलेटला जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणपत्र दिल्याची बातमी खोटी असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) सोमवारी सांगितले. यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. कोरोनील औषध कोविड 19 वर प्रभावी असल्याचा दावा पतंजलीकडून करण्यात आला आहे.
कोणत्याही आयुर्वेदीक औषधाला कोविडवर उपचार करण्यासाठी प्रमाणपत्र दिले नसल्याचे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे. योगगुरू रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने 19 फेब्रुवारीला डब्ल्यूएचओ सर्टिफिकेशन योजनेत कोरोनील औषधाला कोविडवरील उपचारासाठी आयुष मंत्रालयाने प्रमाणपत्र दिल्याचे सांगितले होते.
पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी नंतर ट्वीट करून म्हटले होते की, "कोरोनिलसाठी आम्हाला डब्ल्यूएचओ जीएममी अनुपालन सीओपीपी प्रमाणपत्र भारत सरकार डीजीसीआय, यांनी दिले होते. मात्र, डब्ल्यूएचओने असे कोणतेही औषध मंजूर केले नसल्याचे स्पष्ट आहे. जगभरातील नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी डब्ल्यूएचओ काम करते."
पतंजलीचा यू-टर्न! आम्ही कोरोनावर उपचारासाठी औषध बनवलं नाही : आचार्य बालकृष्ण
देशाचे आरोग्यमंत्री या नात्याने खोट्या दाव्यावर आधारीत औषधाला मान्यता देणे किती न्यायसंगत आहे? असा प्रश्न सोमवारी आयएमएने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. अशा अँटी-कोरोना उत्पादनाच्या तथाकथित क्लिनिकल चाचणीसाठी आपण कालावधी ठरवू शकता का? असेही त्यात म्हटले आहे.
आयएमए म्हणाले, देशाला मंत्र्यांकडून स्पष्टीकरण हवे आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल मेडिकल कमिशनलाही आयएमए पत्र लिहणार आहे. हे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन आहे."
पतंजलीकडून कोरोनावरील औषध 'कोरोनिल' लॉन्च, Covid 19 वर प्रभावी असल्याचा दावा
डब्ल्यूएचओने प्रमाणपत्र दिल्याचा खोटेपणा पाहून इंडियन मेडिकल असोसिएशनला धक्का बसला असल्याचे आयएमएने म्हटलं आहे.
हरिद्वार येथील पतंजली आयुर्वेदने कोविड 19 च्या उपचारासाठी कोरोनील प्रभावी असल्याचे रिसर्च पेपरही असल्याचा दावा केला होता.