एक्स्प्लोर

पतंजलीकडून कोरोनावरील औषध 'कोरोनिल' लॉन्च, Covid 19 वर प्रभावी असल्याचा दावा

योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोनावर औषध निर्माण केल्याचा दावा एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात केला होता.आज अखेर बाबा रामदेव यांनी कोरोना व्हायरसवरील आयुर्वेदिक औषध लॉन्च केले. कोरोना व्हायरसवर मात करणाऱ्या आयुर्वेदिक औषधाचं नाव कोरोनिल असं आहे.

नई दिल्ली: जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरु आहे. कोरोनावर औषध मिळाल्याचा दावा आतापर्यंत अनेक देशांनी केला आहे. यातच योगगुरु बाबा रामदेव यांनी देखील कोरोनावर औषध निर्माण केल्याचा दावा एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात केला होता. आज अखेर बाबा रामदेव यांनी कोरोना व्हायरसवरील आयुर्वेदिक औषध लॉन्च केले. एका पत्रकार परिषदेत योगगुरु रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण यांनी याबाबत घोषणा केली. यावेळी औषधाच्या ट्रायलमध्ये सहभागी शास्त्रज्ञ, डॉक्टर, रिसर्चर उपस्थित होते. कोरोना व्हायरसवर मात करणाऱ्या आयुर्वेदिक औषधाचं नाव कोरोनिल असं आहे. यावेळी रामदेव बाबा म्हणाले की,  संपूर्ण सायंटिफिक डॉक्यूमेंटच्या आधारे श्वासारी वटी, कोरोनिल ही कोरोनावरील एविडेंस बेस  असलेलं पहिलं आयुर्वेदिक औषध आहे. पतंजलीच्या मते, हा रिसर्च संयुक्तपणे पतंजली रिसर्च इंस्टीट्यूट (पीआरआय) हरिद्वार, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस (NIMS), जयपूरने केला आहे. या औषधाची निर्मिती दिव्य फार्मसी, हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वारकडून केली जात आहे. आचार्य बालकृष्ण यावेळी म्हणाले की, आज पतंजली परिवारासाठी मोठा दिवस आहे. मानवतेच्या सेवेसाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. ही आनंदाची बातमी सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. पतंजलीच्या सर्व शास्त्रज्ञांचे,  NIMS यूनिवर्सिटीचे डॉक्टर बलवीर सिंह आणि सर्वांचं अभिनंदन. आयुर्वेद पुन्हा आपलं गतवैभव मिळवू शकेल, असा विश्वास आहे, यासाठी हे प्रेरक आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत जगात भारत चौथ्या स्थानी आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार 933 ने वाढ झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 40 हजार 215 वर पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 48 हजार 190 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 56.37 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 78 हजार 014 रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात 10 हजार 994 रुग्ण बरे झाले झाले आहेत तर 312 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. देशात एकूण मृतांची संख्या 14 हजार 11 वर पोहोचली आहे. माझा कट्टा कार्यक्रमात केला होता दावा कोरोनावर औषध सापडलं असल्याचा दावा रामदेव बाबा यांनी 13 जून रोजी केला होता. या औषधानं रुग्ण बरं होण्याचं प्रमाण जवळपास 99.99 टक्के आहे, असा दावा योगगुरु रामदेवबाबांनी केला होता.  बाबांच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे आयुर्वेदिक औषधांच्या संशोधनासाठी 500 वैज्ञानिकांची मोठी टीम कार्यरत आहे. केवळ कोरोनाच नव्हे तर वेगवेगळ्या रोगांवर औषध शोधण्याचं प्रमाण सातत्यानं पतंजली करतेय, असं रामदेव बाबा त्यावेळी म्हणाले होते. Ramdev Baba | कोरोनावर सापडलेला रामबाण उपाय नेमका काय आहे? ऐका योगगुरू रामदेव बाबांकडून | माझा कट्टा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडलेABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Embed widget