IIT-JEE Exam Update | IIT-JEE परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर
आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या JEE आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असणारी NEET या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली : आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या JEE परीक्षेची तारिख जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भवामुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता 18 ते 23 जुलै दरम्यान, JEE MAIN ची परीक्षा घेण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असणारी NEET परीक्षा 26 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी जेईई आणि नीट परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले की, 'IIT-JEE (MAIN) परीक्षा 18, 20, 21, 22 आणि 23 जुलै रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ऑगस्टमध्ये आयोजित होणाऱ्या IIT-JEE अॅडव्हान्स परीक्षांचं वेळापत्र काही दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. NEET परीक्षा 26 जुलै रोजी घेण्यात येणार आहे.'
जेईई परीक्षांमार्फत देशभरातील इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो. तर राष्ट्रीय पात्रतेसह घेण्यात येणाऱ्या NEET परीक्षेमार्फत देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो.
देशभरातील 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी अर्ज केला आहे. या परीक्षेमार्फत देशभरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो. तर 9 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई-मेंस परीक्षेसाठी अर्ज केला आहे. जेईई मेन्स परीक्षेमार्फत आयआयटी वगळता इतर इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो. जेईई मेन्स परीक्षा जेईई अॅडवान्स परीक्षेसाठी महत्त्वाची मानली जाते. जेईई अॅडवान्स परीक्षेमार्फत आयआयटीमध्ये प्रेवश देण्यात येतो.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले की, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) च्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखाही लवकरच जाहीर केल्या जातील.
संबंधित बातम्या :
अल्पसंख्याक मेडिकल, डेंटल कॉलेजांनाही 'नीट' परीक्षा सक्तीची; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय