Liz Truss In ABP Network Ideas of India Summit : जागतिक व्यासपीठावर आता भारताचा आवाज; एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया समिट'मध्ये ब्रिटनच्या माजी पीएम लिझ ट्रस यांचे स्पष्ट मत
Liz Truss In ABP Network Ideas of India Summit : जग सद्यस्थितीत गंभीर वळणावर येऊन ठेपले असतानाच जागतिक व्यासपीठावर आता भारताचा आवाज असल्याचे मत ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी व्यक्त केले आहे.
Liz Truss in ABP Network Ideas of India Summit : जग सद्यस्थितीत गंभीर वळणावर येऊन ठेपले असतानाच जागतिक व्यासपीठावर आता भारताचा आवाज असल्याचे स्पष्ट मत ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रस (Former British Prime Minister Liz Truss) यांनी व्यक्त केले. एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया समिट'मध्ये (ABP Network Ideas of India Summit) बोलताना लिझ ट्रस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी भारताच्या प्रगतीवर भाष्य केले.
लिझ ट्रस (Liz Truss) एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया समिट'मध्ये बोलताना म्हणाल्या की, भारत स्वातंत्र्यावर, लोकशाहीवर विश्वास ठेवतो आणि येत्या काही वर्षांत ते महत्त्वाचे असेल. त्या बोलताना पुढे म्हणाल्या की, भारत हा ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा गुंतवणूकदार देश आहे. लिझ ट्रस यांनी यावेळी आपल्या पहिल्या मुंबई (Mumbai) भेटीतील आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, त्यांच्या पहिल्या भेटीत शहराची उर्जा आणि उत्साहाने त्या भारावून गेल्या होत्या.
लिझ ट्रस यांनी ब्रिटनमधील काॅन्झवेटिव्ह पक्षाच्या (United Kingdom's Conservative Party) नेत्या असून त्यांनी अत्यंत अल्प काळासाठी ब्रिटनचे पंतप्रधानपद भूषवले आहे. त्या अवघ्या 45 दिवसांसाठी ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या. बोरीस जाॅन्सन यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची नेमणूक झाली होती. बोरीस जाॅन्सन ऋषी सुनक यांचा पराभव करून पंतप्रधान झाले होते. मात्र, त्यांनाही राजीनामा द्यावा लागल्यानंतर लिझ ट्रझ पंतप्रधान झाल्या होत्या. क्वीन एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांनी मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वी लिझ ट्रस यांची नियुक्ती केली होती. त्यांनी अवघ्या 45 दिवसांमध्ये ऑक्टोबर 2022 मध्ये राजीनामा दिला होता. दरम्यान, लिझ ट्रस यांची (South West Norfolk Conservative Association) कडून आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, एबीपी नेटवर्क आयोजित 'आयडियाज ऑफ इंडिया समिट' पार पडत आहे. 'Naya India: Looking Inward, Reaching Out' या थिमवर ही समिट पार पडत आहे. आज (24 फेब्रुवारी) आणि उद्या अशी दोन दिवस ही समिट होत आहे. यामध्ये देश विदेशातीर रथी महारथी विचारमंथन करणार आहेत. यामध्ये सध्याच्या हवामान बदलाने जागतिक अर्थव्यवस्थेला निर्माण झालेल्या संकटांवर आपली मते मांडतील.
एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया समिट'मध्ये या समिटमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, गीतकार आणि कवी जावेद अख्तर, गायक लकी अली आणि शुभा मुदगल, लेखक अमिताभ यांसारखे उल्लेखनीय वक्ते दिसणार आहेत. अभिनेत्री सारा अली खान आणि झीनत अमान, अभिनेता आयुष्मान खुराना आणि मनोज वाजपेयी, सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना, स्पोर्ट्स स्टार ज्वाला गुट्टा आणि विनेश फोगट आदी मंडळी सहभागी होणार आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या :