एक्स्प्लोर

Narayana Murthy : 'भारताला समृद्ध होण्यासाठी प्रामाणिक संस्कृतीची गरज, पक्षपाताची नाही', नारायण मूर्ती यांनी व्यक्त केली चिंता

India Business Culture : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी म्हटलं की, ''भारताला एक देश म्हणून समृद्ध होण्यासाठी प्रामाणिकपणाची संस्कृती आवश्यक आहे.''

Narayana Murthy on India Business Culture :  इन्फोसिसचे संस्थापक (Infosys Founder) एन.आर. नारायण मूर्ती (N.R. Narayana Murthy) यांनी भारतीय व्यावसायिक पद्वतीवर (India Business Culture) चिंता व्यक्त केली आहे त्यांनी म्हटलं आहे की, 'भारताला समृद्ध होण्यासाठी प्रामाणिक संस्कृतीची गरज ज्यामध्ये पक्षपाताला जागा नसावी.' त्यांनी सांगितलं की, , ''भारताला समृद्ध होण्यासाठी जलद निर्णय घेण्याची, जलद अंमलबजावणी, त्रासमुक्त सोपे व्यवहार, व्यवहारात प्रामाणिकपणा आणि पक्षपात न करण्याची संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे.''

भारतातील सध्याच्या व्यावसायिक वातावरणावर भाष्य

परराष्ट्र मंत्रालयाने पुणे येथे आयोजित आशिया इकॉनॉमिक डायलॉग या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. यामध्ये मूर्ती यांनी हजेरी लावली. त्यांनी म्हटलं की, देशातील केवळ एक छोटासा वर्ग कठोर परिश्रम करतो. पंतप्रधानांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली संस्कृती अद्यापही बहुतेक लोकांनी आत्मसात केलेली नाही. मूर्ती यांनी भारतातील सध्याच्या व्यावसायिक वातावरणावर भाष्य केलं आहे.

''कोणताही पक्षपात न करता झटपट निर्णय''

मूर्ती यांनी म्हटलं की, ''भारताला एक देश म्हणून समृद्ध होण्यासाठी प्रामाणिकपणाची संस्कृती आवश्यक आहे.'' त्यांनी पुढे सांगितलं की, ''भारतात अशी संस्कृती असली पाहिजे जिथे कोणताही पक्षपात न करता झटपट निर्णय घेतले जातील. तसेच व्यवहार प्रामाणिकपणे आणि सहजतेने पूर्ण करता येतील.''

चीनचं केलं कौतुक

आपल्याला जलद निर्णय घेण्याची, जलद अंमलबजावणी, त्रासमुक्त व्यवहार, व्यवहारात प्रामाणिकपणा आणि पक्षपात न करण्याची संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे, असं नारायण मूर्ती यांनी म्हटलं. त्यांनी सांगितलं की, 1940 च्या शेवटी भारत आणि चीन या दोन्ही देशांचा व्यावसायिक आकार समान होता, पण आता चीनचं व्यावसायिक आकारमान भारताच्या आकारमानाच्या सहा पटीने वाढलं आहे, कारण त्यांनी ही संस्कृती आत्मसात केली आहे.

मूर्ती यांनी व्यक्त केली 'ही' इच्छा

मूर्ती यांनी म्हटलं की, भारतीय उद्योगपतींनी भारतातच राहून उद्योग करायचे शक्य झाल्यास फार आनंद होईल. भारतात चांगल्या कंपन्यांची कमतरता आहे. यूनीकॉर्न्स कंपन्या म्हणजेच एक अब्ज डॉलरची उलाढाल असणाऱ्या कंपन्याची कमी आहे. यामुळे खूप नुकसान होतं. मूर्ती यांनी सांगितलं की, 'आम्हा भारतीय उद्योगपतींनी फक्त भारतातच राहायचे असेल आणि भारतातच सर्व काही करायचे असेल तर तसं करण्यात आम्हाला खूप आनंद होईल. यासाठी सरकारने निर्णय त्वरित घेतले जावे आणि त्यांची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

World Bank Head : भारतीय वंशाचे अजय बंगा होणार वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष, बायडन यांनी दिला प्रस्ताव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget