एक्स्प्लोर
ICSE Result : आयसीएसई, आयएससी परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घवघवीत यश !
सीबीएसई दहावी आणि बारावी निकालानंतर आज आयसीएसई आणि आयएससी दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये ISC परीक्षेचा निकाल 96.52 % लागला.
नवी दिल्ली : सीबीएसई दहावी आणि बारावी निकालानंतर आज आयसीएसई आणि आयएससी दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये ISC परीक्षेचा निकाल 96.52 % लागला. मागील वर्षीच्या तुलनेत 0.31% ने या निकालात वाढ पाहायला मिळाली तर आयसीएसईचा निकाल यावर्षी 98.54 लागला.
या निकालात मुंबईच्या जमनाबाई नर्सी शाळेची जुही कजारियाने 99.60% मार्क्स मिळवून देशात पहिली येण्याचा मान मिळवला. तर मुंबईचे फोरम संजनवाला,अनुश्री चौधरी, अनुष्का अग्निहोत्री आणि ठाण्याचा यश भन्साळीने 99.40%मिळवून देशात दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं. अनुष्का अग्निहोत्री अनुष्का ही कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्समधील चिल्ड्रन्स अकॅडमी शाळेतील विद्यार्थिनी आहे. तिसऱ्या क्रमांकावर राज्यातील एकूण 11 जणांनी 99.20 टक्के गुण मिळवले आहे. तर देशात मुक्तसारच्या मन्नार बन्सल याने सुद्धा 99.60 टक्के गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. अनुष्का अग्निहोत्री तर आयएससी परीक्षेत मुंबईच्या मिहिका सावंतने देशात 99.75 टक्के गुण मिळवून देशात दुसरा येण्याचा मान पटकवला. तर देशात आयएससी परीक्षेत कोलकत्ताच्या देवांग अग्रवाल आणि बंगलोरची विभा स्वामिनाथन यांनी 100 टक्के गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळवला यंदा ICSE दहावीची परीक्षा 22 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. तर ICSE बारावीची परीक्षा 4 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान झाली होती. आयसीएसईच्या दहावी परीक्षेचा निकाल 98.54 टक्के इतका लागला आहे. तर बारावी परीक्षेचा निकाल 96.52 टक्के इतका लागला आहे. आयसीएसई परीक्षेत यंदाच्या निकालांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. आयसीएसई परीक्षेत 99.20 टक्के गुण मिळवत तिसऱ्या क्रमांकावर असलेले महाराष्ट्रतील विद्यार्थी : वीर भन्साळी, मुंबई दृष्टी अत्राडे, नाशिक जुगल पटेल,मुंबई करन आंद्रडे, मुंबई जारावान श्रॉफ, मुंबई आदित्य वाघचौरे, ठाणे हुसेन बसराई, मुंबई अमन झवेरी,मुंबई हर्ष वोरा, मुंबई श्रीनभ अग्रवाल, नागपूर ओजस देशपांडे, ठाणेIndian School Certificate Examinations(ICSE) Class 10th and Class 12th results declared
— ANI (@ANI) May 7, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement