(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Advisory : एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या निरोगी प्रवाशांना आरटीपीसीआरची सक्ती नको, ICMR च्या सूचना
देशभरात कोरोनाचा कहर अधिक झपाट्यानं वाढत असतानाच आता कोरोना चाचण्यांसंदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना आयसीएमआरकरुन देण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा कहर अधिक झपाट्यानं वाढत असतानाच आता कोरोना चाचण्यांसंदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना आयसीएमआरकडून मंगळवारी देण्यात आल्या आहेत. Indian Council of Medical Research यांच्याकडून टेस्टिंग लॅबवर असणारा ताण कमी करण्यासाठी म्हणून अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत निरोगी प्रवाशांना देशांतर्गत प्रवासासाठी असणारी आरपीसीआर चाचणीची अट शिथिल केली आहे.
टेस्टिंग लॅबवर सध्याच्या घडीला असणारा प्रचंड ताण पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगत नागरिकांसाठी टेस्ट लॅबमध्ये आरटीपीसीआर चाचणीची उपलब्धता वाढवण्याची गरजही व्यक्त केली. आयसीएमआरच्या माहितीनुसार देशात दर दिवशी नव्यानं कोरोनाबाधित होणाऱ्यांची आणि या विषाणूमुळं मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. देशात सध्या कोरोनाचा पॉझिटीव्हिटी रेट हा 20 टक्क्यांवर आहे. त्या धर्तीवर देशात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणीही घेण्यात येत आहे. चाचणीसाठी RTPCR, TrueNat, CBNAAT आणि इतरही पर्याय उपलब्ध आहेत अशी माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी चाचणी करुन रुग्णावर योग्य उपचार करणं, त्यांचे संपर्क शोधणं यासोबतच विलगीकरण या पर्यायांच्याच मदतीनं कोरोना नियंत्रणात आणला जाऊ शकतो.
आरटीपीसीआर चाचणीसाठीच्या मार्गदर्शक सूचना
- एकदा आरटीपीसीआर केल्यानंतर या चाचणीच्या माध्यमातून पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तीनं पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करु नये.
- रुग्णालयातून डिस्चार्ज घेतेवेळी कोरोनातून सावरलेल्या रुग्णांची कोरोना चाचणी आवश्यक नाही.
- चाचणी केंद्रांवर असणारा ताण कमी करण्यासाठी निरोगी व्यक्तींच्या आंतरदेशीय प्रवासामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचा अट्टहास नको.
- कोविड किंवा तापाची लक्षणं असणाऱ्यांनी स्थानिक आणि आंतरदेशीय प्रवास टाळावा.
- अत्यावश्यक कारणासाठी प्रवास करणाऱ्या आणि लक्षणं नसणाऱ्या व्यक्तींनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं.
- मोबाईल टेस्टिंग लॅबची उपलब्धता करण्यात आली असून, राज्यांनी ही सेवा अवलंबात आणावी.
इतर महत्त्वाच्या सूचना
- सर्व राज्यांनी खासगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या चाचणी सुविधांचा वापर करावा.
- RAT चाचण्या आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच व्हाव्यात.
- RAT चाचणीनंतर पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तीला पुन्हा चाचणी करण्याचा सल्ला देऊ नये. अशा व्यक्तींना घरीच राहून योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला द्यावा.
- सर्व RTPCR and RAT चाचण्यांचे अहवाल आयसीएमआरच्या पोर्टलवर अपलोड केले जाणं बंधनकारक