एक्स्प्लोर
IAS अधिकाऱ्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एका आयएएस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आशिष दहिया यांचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला. दक्षिण दिल्लीच्या बेरसराय परिसरात ही घटना घडली.
सहकारी महिलेलाल वाचवण्याच्या प्रयत्नात आशिष दहिया यांचा मृत्यू झाला. दरम्यान आयएएस अधिकारी आशिष दहिया यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरण्याच्या चौकशीची मागणी केली आहे.
30 वर्षीय आशिष दहिया पत्नी प्रज्ञासह फॉरेन सर्व्हिस इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या मित्रांना भेटण्यासाठी गेले होते. यानंतर सगळ्यांनी स्विमिंग पूलजवळ रात्री उशिरापर्यंत पार्टी केली.
घटनास्थळी उपस्थित एक व्यक्तीच्या माहितीनुसार, एक महिला अधिकारी पाय घसरुन स्विमिंग पूलमध्ये पडली. तिला वाचवण्यासाठी आशिष दहिया यांच्यासह तिथल्या काही लोकांनी स्विमिंग पूलमध्ये उडी मारली.
अधिकारी महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं, परंतु आशिष दहिया पूलमध्ये राहिले. काही वेळाने आशिष दहियांना बाहेर काढण्यात आलं. यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी त्यांना सीपीआस देण्याचाही प्रयत्न केला. मात्र रात्री एकच्या सुमारास आशिष दहिया यांना मृत घोषित करण्यात आलं.
आशिष दहिया हे मूळचे हरियाणाच्या सोनीपतचे रहिवासी होते. 2015 मध्ये ते हिमाचल पोलिसात उपअधीक्षक पदावर तैनात होते. यानंतर 2015 मध्येच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 411 क्रमांक मिळवून त्यांना फरीदाबामध्ये अबकारी आयुक्त म्हणून नियुक्ती मिळाली होती. पण पुढील वर्षी 2016 मध्ये रँक सुधारत ते 53 वर आले. आशिष यांनी प्रशिक्षणादरम्यान सुवर्णपदकाची कमाई केली होती. 31 मे रोजी ते जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार होते.
दरम्यान, आशिष यांच्या मृत्यूवर कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. शिवाय या घटनेची स्वतंत्र तपास करण्याची मागणीही कुटुंबीयांनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement