Rahul Gandhi : मी 'आयडिया ऑफ इंडिया'साठी लढणार, भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फायदाच : राहुल गांधी
मी 'आइडिया ऑफ इंडिया'साठी (Idea of India) लढणार असल्याचे मत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
Rahul Gandhi : काँग्रेस (Congress) पक्षाचा एक सदस्य म्हणून मी भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी झालो असल्याचे मत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी व्यक्त केलं. भारत जोडो यात्रेवर भाजपचे (BJP) नेते टीका करत आहेत, त्यांचे स्वागत आहे. मात्र, देशातील सध्याची परस्थिती मी जाणून घेत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं (RSS) देशाचं नुकसान केलं आहे. अनेक लोकांना वाटते की भाजपशी हातमिळवणी करावी, त्यांच्याशी लढाई कशासाठी? पण मी 'आयडिया ऑफ इंडिया'साठी (Idea of India) लढणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेसचे नेते वेगवेगळी मत व्यक्त करत आहेत, याबाबत देखील राहुल गांधी या प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, भाजपच्या नेते त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. भाजपने सर्व संस्था काबीज केल्या आहेत. ही लढाई पक्षांमध्ये नाही, तर भारतीय संघराज्य रचना आणि विरोधी पक्षांमध्ये आहे. ही विचारांची लढाई हजारो वर्षांपासून सुरु असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
देशातील लोकांशी संवाद गरजेचा
देशात राजकीय ऐक्य निर्माण करण्यासाठी काय करणार आहेत, असा देखील राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, सध्या मी लोकांनी संपर्क साधून, त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. सध्या देशाला जोडण्याची गरज आहे. सध्या लोक एकोप्याने राहतात का? धर्म, राज्य, भाषा या आधारावर विभागणी झाली आहे. काही लोकांनाच सर्व मालमत्ता दिली जात आहे. भारत हे लोकांमधील संवादाचे नाव आहे. संवाद आवश्यक असल्याचेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.
विरोधकांची एकजूट करण्यावर चर्चा सुरु
काँग्रेस अध्यक्षपदावरुन देखील राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यात आला, यावेळी ते म्हणाले की, निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच तुम्हाला कळेल की मी अध्यक्ष होतोय की नाही असे ते म्हणाले. मी भारत जोडो यात्रेत सहभागी झालो आहे, नेतृत्व करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारत जोडो यात्रेमुळं काँग्रेसचा फायदाच होईल, नुकसान होणार नाही. विरोधकांची एकजूट करण्यावर चर्चा सुरु असल्याचेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: