एक्स्प्लोर

हैदराबाद बलात्कार पीडितेला जाळण्यासाठी पेट्रोल खरेदीसाठी आलेल्या नराधमाचे CCTV फुटेज हाती

महिला पशु वैद्य सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यात एक आरोपी पेट्रोल पंपावर पेट्रोल खरेदी करताना दिसत आहे.

हैदराबाद : महिला पशु वैद्य सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी एक व्हिडीओ समोर आला आहे. याच व्हिडीओच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली होती. हा व्हिडीओ हैदराबादमधील एका पेट्रोलपंपाचा असून यात बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी जोलू शिवा दिसत आहे. हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे सर्व देशात संतापाची लाट उसळली होती. यातील चार आरोपींना घटनेचे रिकंस्ट्रक्शन करण्यासाठी घटनास्थळी नेण्यात आलं होतं. त्यादरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न करताना पोलीसांनी चारही आरोपींचा एन्काऊंटर केला. यानंतर देशातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या असून घटनेची चौकशी सुरु आहे. आरोपी जोलू शिवा घटनेच्या दिवशी रात्री 12:56 वाजता पंपावर पेट्रोल खरेदीसाठी आला होता. याच व्हिडीओच्या आधारे पोलिस आरोपींपर्यंत पोहचले. दरम्यान, शनिवारी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 7 सदस्यीस शिष्टमंडळाने या भागाचा दौरा केला. यात एनएचआरसी पथकाने चट्टनपल्ली गावाला भेट दिली जिथे एन्काऊंटर झाला, ही जागा पशु वैद्य सामूहिक बलात्कार आणि हत्या झालेल्या ठिकाणापासून जवळच आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन केल्यानंतर महबूबनगर येथे ठेवलेल्या आरोपींच्या मृतदेहांचेही एनएचआरसी पथकाने निरिक्षण केले. आरोपींचे शवविच्छेदन करतानाचेही चित्रिकरण करण्यात आले आहे. पोलीसांवर हल्ला केल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल - घटनेचे रिकंस्ट्रक्शन करण्यासाठी घेऊन गेले असताना पोलीसांवर हल्ला करुन पलायन करताना चारही आरोपी पोलीसांच्या एन्काऊंटरमध्ये मारले गेले. याप्रकरणी चारही आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती तेलंगाणा पोलीसांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने दोन जनहित याचिका दाखल करत निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. न्याय म्हणजे बदला नाही - सरन्यायाधीश न्याय म्हणजे बदला नाही, अशी प्रतिक्रिया हैदराबाद येथील बलात्कार-हत्या प्रकरणात आरोपींच्या झालेल्या एन्काऊंटरनंतर दिली. सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले, न्याय कधीच तात्काळ असू शकत नाही, त्याने सूडाचे रूप घेतले तर तो न्याय राहत नाही. राजस्थान उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात सरन्यायाधीश बोबडे यांनी महिलांवरील अत्याचारांच्या अनुषंगाने सुरु झालेल्या जलद न्यायदानाच्या चर्चेबाबत परखड मते मांडली. संबंधित बातम्या - काय आहे उन्नावचं बलात्कार प्रकरण, नेमकं काय घडलं? महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर दिल्लीत तरुणाई आक्रमक, राजघाट ते इंडिया गेटपर्यंत कँडल मार्च Hyderabad Encounter | हैदराबाद एन्काऊंटरमधला एक आरोपी सराईत गुन्हेगार | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget