Fish Prasadam : जिवंत मासा घशात सोडून दमा बरा होणार... तीन वर्षांच्या खंडानंतर दम्यावरील रामबाण उपाय 'फिश प्रसादम'ला हैदराबादमध्ये सुरुवात
Fish Medicine : जिवंत माश्याच्या तोंडाला औषध लावलं जातं आणि तो मासा थेट रुग्णाच्या घशात सोडला जातो. बाथिनी कुटुंबाकडून (Bathini Family) गेल्या शंभर वर्षापासून अशा प्रकारचा उपचार दिला जातो.
Bathini Fish Prasadam : दम्याचा आजार असणाऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या हैदराबादच्या 'फिश प्रसादम' (Fish Prasadam) अर्थात दम्यावरील घरगुती तयार केलेल्या औषधाच्या वाटपाला आजपासून सुरूवात झाली आहे. दरवर्षी मृग नक्षत्र (Mrigasira Karti) सुरू झाल्यानंतर दोन दिवस या माशाच्या तोंडाला लावण्यात आलेल्या औषधाचं वाटप करण्यात येतं. जिवंत माशाच्या तोंडाला विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेलं औषध लावण्यात येतं आणि तो मासा रुग्णाच्या घशात सोडण्यात येतो. हैदराबादच्या बाथिनी कुटुंबाकडून (Bathini Family) हे औषध दमाग्रस्तांना देण्यात येतं. या वर्षी शुक्रवार 9 जून आणि शनिवारी 10 जून रोजी या औषधाचं वाटप करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून या औषधाचं ( Hyderabad Fish Prasadam) वाटप करण्यात आलं होतं. यंदा मात्र मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर या फिश प्रसादमचं वाटप सुरू झालं आहे. देशभरातून लाखो दमाग्रस्त रुग्ण हे औषध घेण्यासाठी हैदराबादमध्ये येतात. तसेच हा उपचार घेण्यासाठी काही परदेशी नागरिक आणि एनआरआयही हैदराबादमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. हैदराबामधील नामपल्ली एक्झिबिशन ग्राऊंडवर हा उपचार दिला जात आहे.
तेलंगणाचे पशुसंवर्धन मंत्री तलासनी श्रीनिवास यादव यांच्या हस्ते 'फिश प्रसादम' चे वितरण सुरू करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी तेलंगणा सरकारने सर्व व्यवस्था केली आहे. या वर्षी जवळपास सहा लाख रुग्ण हा उपचार घेण्यासाठी येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
Hyderabad Fish Prasadam : जिवंत मासा औषधासोबत खाल्ल्याने दमा बरा
हैदराबादच्या बाथिनी कुटुंबाकडून हा उपचार दिला जातोय. यासाठी विशिष्ठ प्रकारचे औषध तयार करण्यात येतं आणि ज्याला दम्याचा त्रास आहे त्याला दिलं जातं. बाथिनी कुटुंबातील व्यक्ती जिवंत माशाच्या तोंडाला ते औषध लावते आणि दमाग्रस्त व्यक्तीच्या थेट घशात तो मासा सोडला जातो. यासाठी 'मरेल' या प्रकारचा मासा वापरण्यात येतो.
बाथिनी हरिनाथ गौड कुटुंबीयांकडून दिल्या जाणाऱ्या 'फिश प्रसादम'वर लोकांचा खूप विश्वास आहे. गेल्या 190 वर्षांहून अधिक काळापासून बाथिनी कुटुंबाकडून दरवर्षी 'मृगसिरा कार्थी'च्या दिवशी 'फिश प्रसादम' चे वाटप केलं जातं.
'फिश प्रसादम'च्या औषधी गुणधर्मांवर अनेक शास्त्रज्ञ, तर्कवादी आणि इतरांनी अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र दरवर्षी हजारो लोक हा फिश प्रसादम घेण्यासाठी शहरात येतात.
ही बातमी वाचा:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )