एक्स्प्लोर

एक रुपयाच्या नोटेचा 100 वर्षांचा रंजक प्रवास

एक रुपयाच्या नोटेबाबत खास गोष्ट म्हणजे, ही नोट इतर भारतीय नोटांप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून जारी केली जात नाही, तर भारत सरकारकडून जारी केली जाते. त्यामुळे एक रुपयाच्या नोटेवर आरबीआय गव्हर्नरची स्वाक्षरी नसते, तर केंद्रीय अर्थसचिवांची स्वाक्षरी असते.

मुंबई : एक रुपयाची नोट शंभर वर्षांची झाली आहे. चांदीचं नाणं ते नोट असा हा गेल्या 100 वर्षांचा प्रवास अत्यंत रंजक असाच आहे.    चांदीचं नाणं ते नोट पहिल्या महायुद्धाचा तो काळ होतो आणि भारतात इंग्रजांची सत्ता होती. त्यावेळी भारतात एक रुपयाचं नाणं चलनात होतं. विशेष म्हणजे, हे नाणं चांदीपासून बनवलं जाई. मात्र युद्धादरम्यान चांदीचं नाणं बनवणं परवडण्यासारखं नव्हतं. त्यामुळे 1917 मध्ये पहिल्यांदा एक रुपयाची नोट चलनात आणली गेली आणि या नोटेने चांदीच्या नाण्याची जागा घेतली. एक रुपयाची नोट छापली गेली, ती तारीख होती 30 नोव्हेंबर 1917. या नोटेवर इंग्लंडचा राजा जॉर्ज पंचमचा फोटो छापण्यात आला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, एक रुपयाच्या नोटेची छपाई पहिल्यांदा 1926 मध्ये बंद करण्यात आली होती. कारण नोट छापण्याचा खर्च परवडत नव्हता. त्यानंतर 1940 मध्ये पुन्हा छपाई सुरु करण्यात आली, जी 1994 सालापर्यंत चालू राहिली. त्यानंतर 2015 साली पुन्हा छपाई सुरु करण्यात आली. एक रुपयाच्या नोटेवर कुणाची स्वाक्षरी असते? एक रुपयाच्या नोटेबाबत खास गोष्ट म्हणजे, ही नोट इतर भारतीय नोटांप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून जारी केली जात नाही, तर भारत सरकारकडून जारी केली जाते. त्यामुळे एक रुपयाच्या नोटेवर आरबीआय गव्हर्नरची स्वाक्षरी नसते, तर केंद्रीय अर्थसचिवांची स्वाक्षरी असते. कायद्याच्या आधारे एक रुपयाची नोट ही खऱ्या अर्थाने ‘मुद्रा’ नोट (करन्सी नोट) आहे. इतर नोटा या प्रॉमिसरी नोट असतात. प्रॉमिसरी नोटांवरुन केवळ नमूद रक्कम देण्याचं वचन दिले जाते. दादरमधील नाण्यांचा संग्रह करणाऱ्या गिरीश वीरा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले, “पहिल्या युद्धादरम्यान चांदीचे दर वाढले, त्यामुळे जी पहिली नोट छापण्यात आली, तिच्यावर एक रुपयाच्या चांदीच्या नाण्याचा फोटो छापण्यात आला. तेव्हापासून ती एक परंपराच झाली की, एक रुपयाच्या नोटेवर एक रुपयाच्या नाण्याचा फोटो छापला जाऊ लागला.” आणखी एक रंजक बाब म्हणजे, इंग्रजांच्या काळात एक रुपयाच्या नोटेवर ब्रिटिश सरकारच्या तीन अर्थ सचिवांच्या स्वाक्षऱ्या असायच्या. एमएमएस गुब्बे, एसी मॅकवॉटर्स आणि एच. डेनिंग यांच्या स्वाक्षऱ्या नोटेवर असायच्या. मात्र भारताच्या स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत 18 अर्थसचिवांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या नोटा जारी करण्यात आल्या आहेत. एक रुपयाच्या नोटेची छपाई इतिहासात आतापर्यंत दोनदा रोखण्यात आली होती. शिवाय, नोटेच्या डिझाईनमध्येही तीन-एकवेळा लहान-मोठे बदल करण्यात आले होते, असेही गिरीश वीरा यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Embed widget