एक्स्प्लोर
नाताळच्या सेलिब्रेशनसाठी गोव्यात पर्यटकांची गर्दी
अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोमंतकिय सज्ज झाले आहेत. गोव्यातील बाजारपेठा खरेदीसाठी नागरिकांनी फुलून गेल्या आहेत.

पणजी : अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोमंतकिय सज्ज झाले आहेत. गोव्यातील बाजारपेठा खरेदीसाठी नागरिकांनी फुलून गेल्या आहेत. नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी देश विदेशातील लाखो पर्यटक गोव्यात दाखल होण्यास सुरुवात झाली असून पूढचे काही दिवस गोव्यात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. सलगच्या सुट्ट्यांमुळे गोव्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येण्यास सुरुवात झाली आहेत. तसंच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गोव्यातील बहुतेक सगळी हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली आहेत. पर्यटन हंगामात हॉटेल्स आणि इतर सेवांचे दर जास्त असूनदेखील पर्यटकांच्या उत्साहावर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही.
आणखी वाचा























