एक्स्प्लोर

छापखाना ते एटीएम, नोटेचा प्रवास कसा होतो?

मुंबई : देशभरात सध्या वेगवेगळ्या बँकांची मिळून तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त एटीएम आहेत. सध्या नोटाबंदीमुळे अनेक एटीएम बंद आहेत किंवा सुरु असलेल्या एटीएमपुढे भल्यामोठ्या रांगा आहेत. काही जीपीएस आधारित किंवा ग्राहक स्वतःहून पुरवत असलेल्या माहितीवरुन, आपल्या परिसरातील एटीएममध्ये कॅश उपलब्ध आहे की नाही, हे सांगणाऱ्या साईटचीही खूप चलती आहे. वेगवेगळ्या सोशल मीडियावरुन या साईटच्या लिंक फॉरवर्ड होत आहेत. तसंच काही ग्राहक आपापल्या ग्रुपमध्ये तसंच मित्रांनाही कोणत्या एटीएममध्ये कॅश आहे, किती मोठी रांग आहे, याविषयीची माहिती कळवत आहेत. एटीएम म्हणजे अॅटोमॅटिक टेलर मशिन. पण आपल्याकडे त्याला सोप्या भाषेत एनी टाईम मनी असंही म्हणतात. सुरुवातीला ठीक होतं, पण सध्याच्या नोटाबंदीच्या काळात एटीएम म्हणजे एनी टाईम मनी आहेतच असं नाही. या एटीएममध्ये पैसे येतात तरी कसे... या प्रश्नाचं अगदी सोपं उत्तर सांगायचं तर जे एटीएम संबंधित बँकेच्या शाखेजवळ असतात, तिथले अधिकारीच त्या एटीएममध्ये कॅश भरतात. तर जे एटीएम ऑफसाईट असतात, तिथे एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कंपनीची गाडी येते, तेव्हा त्यात कॅश भरली जाते. पण मुळातच करन्सी नोट प्रेसमधून निघाल्यापासून तुमच्या आमच्या दैनंदिन वापराच्या एटीएमपर्यंत नोट पोहोचण्याचा प्रवास असतो तरी कसा नेमका.... 1. भारतात चलनी नोटा छापण्याचे चार छापखाने आहेत. आपल्या महाराष्ट्रात नाशिकमध्ये त्यापैकी एक छापखाना आहे. त्याशिवाय मध्य प्रदेशातील देवास येथे आणि उर्वरीत दोन कर्नाटकातल्या म्हैसूर आणि पश्चिम बंगालमधल्या साल्बनीमध्ये आहेत. या चार छापखान्यात चलनी नोटांची छपाई होते. 2. या चार ठिकाणी छापलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेला सुपूर्द केल्या जातात. रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय मुंबईत असलं तरी देशभरातील चार छापखान्यात तयार झालेल्या नोटा मुंबई मुख्यालयात आणल्या जात नाहीत. तर त्या देशभरात विखुरलेल्या रिझर्व्ह बँकेच्या 40 कार्यालयात पोहचवल्या जातात. या सर्व चलनी नोटा खूप मोठ्या संख्येत असतात, म्हणून मोठमोठ्या कंटेनरमधून त्याची वाहतूक होते. 3. रिझर्व्ह बँकेच्या देशभरातील 40 कार्यालयातून या नोटा बँकाच्या मागणीप्रमाणे बँक करन्सी चेस्टकडे पाठवल्या जातात. रिझर्व्ह बँकेची वाहतूक आणि पुरवठ्याच्या सोईसाठी देशभरात अशी तब्बल 2800 चेस्ट आहेत. 4. रिझर्व बँकेच्या चेस्टमधून ग्राहकांचा नियमित संपर्क असलेल्या बँकाच्या मुख्यालयात किंवा प्रादेशिक मुख्यालयात या नोटा पोहोचवल्या जातात. त्यासाठी रिझर्व बँक सुरक्षा रक्षकांनी सज्ज असलेल्या कॅश इन ट्रान्झिट म्हणजे रोकड वाहतूक करणाऱ्या कंपन्याची मदत घेतं. या कंपन्याच ही रोकड बँकांना पोहचवतात. रिझर्व्ह बँकेच्या प्रत्येक करन्सी चेस्टच्या दिमतीला कॅश इन ट्रांझिट कंपनीच्या जवळपास 20 गाड्या दिमतीला असतात. त्यातून गरजेप्रमाणे रोकड बँकांना पोहोचवली जाते. 5. कॅश इन ट्रांझिट कंपन्याच्या सुरक्षा रक्षकांनी सज्ज असलेल्या व्हॅन एका दिवसात जवळपास 10 ते 15 बँक शाखांना रोकड पुरवठा करतात. 6. याच कॅश इन ट्रांझिट कंपन्या रिझर्व बँकेप्रमाणेच काही बँकानाही सेवा पुरवतात. या रोकड वाहतूक पुरवठा करणाऱ्या कंपन्या बँकाच्या नियोजनाप्रमाणे बँक शाखा तसंच ऑफसाईट म्हणजे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या एटीएममध्ये कॅश भरतात. जे एटीएम बँक शाखांशी संलग्न असतात, त्यांच्यात कॅश भरण्याची जबाबदारी मात्र बहुतेक ठिकाणी संबंधित शाखेवरच असते. देशभरातील तब्बल दोन लाख वीस हजार एटीएम पैकी अंदाजे दीड लाख एटीएमला कॅस इन ट्रान्झिट कंपन्या सेवा पुरवतात.

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
CJP Delhi Protest Updates: ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navratri 2026 Saptashrungi Gad: सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांसाठी 24 तास मंदिर खुले, खासगी वाहनांना प्रवेशबंदी, एसटीनेच करावा लागणार प्रवास
सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; भाविकांसाठी 24 तास मंदिर खुले, खासगी वाहनांना प्रवेशबंदी, एसटीनेच करावा लागणार प्रवास
CJP Delhi Protest Updates: ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
Embed widget