Amit Shah Exclusive : गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू होणार का? अमित शाहांनी स्पष्टच सांगितलं
Amit Shah Exclusive : येत्या 1 आणि 5 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एबीपी अस्मिताने खास मुलाखत घेतली. यावेळी अमित शाह यांनी विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.
Amit Shah Exclusive : गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलीय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत बोलताना अमित शाह म्हणाले, "समान नागरी कायदा लागू करणे हे जनसंघाच्या स्थापनेपासून आमच्या अजेंड्याचा भाग आहे. समान नागरी कायदा ही भारतीय जनता पक्षाची देशातील जनतेशी असलेली बांधिलकी आहे. समान नागरी कायदा असावा हे जनसंघापासून ते भारतीय जनता पक्षापर्यंतच्या आमच्या निवडणूक जाहीरनाम्याचा भाग आहे. परंतु, काँग्रेसकडून पहिल्यापासूनच याला विरोध केला जातोय. काँग्रेसने पहिल्यापासून तुष्टीकरणाचे राजकारण केले आहे. राज्यघटनेत कलम 44 अन्वये गार्डियन प्रिंसिपल दिले गेले आहे, ज्यामध्ये राज्यघटनेच्या रचनाकारांची अशी अपेक्षा होती की भविष्यात देशाच्या संसदेने, देशाच्या विधिमंडळांनी समान नागरी कायदा आणावा. समान नागरी कायद्याच्या माध्यमातून संपूर्ण देशात धर्माच्या आधारावर कोणताही कायदा नसावा. कलम 14 आणि कलम 15 दोन्ही स्पष्ट करतात की कोणत्याही व्यक्तीला समान वागणूक दिली पाहिजे. धर्माच्या आधारावर कुणालाही विशेष वागणूक मिळू नये, कुणावर अन्याय होऊ नये.
गुजरातमध्ये सध्या ज्या प्रकारचे राजकीय वातावरण आहे, ते पाहून भाजपच्याच बाजूने लोकांचा कल असल्याचे दिसून येत आहे. हे सर्व पाहून आम्ही आमच्याच पक्षाचे पूर्वीचे विक्रम मोडून पुन्हा एकदा प्रचंड हुमताचं सरकार स्थापन करू.
न्यूज एजन्सींच्या सर्व्हेच्या विश्वासहर्तेवर काहीच सांगता येत नाही. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून गुजरातचं वातावरण मी पाहिलं आहे. यात पाच वेळा आमदार म्हणून विजयी झालोय. त्यामुळे गुजरातच्या लोकांमध्ये, तरुणांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये आणि विशेषत: गुजरातच्या महिलांमध्ये विश्वासाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. हे पाहता आम्ही निश्चितपणे आमचे सर्व विक्रम मोडीत काढू आणि बहुमताने सरकार स्थापन करू.
समान नागरी कायदा लागू करणे हे भारतीय जनता पक्षाच्या जनसंघाच्या स्थापनेपासून आमच्या अजेंड्याचा भाग आहे. समान नागरी कायदा ही भारतीय जनता पक्षाची देशातील जनतेशी असलेली बांधिलकी आहे. समान नागरी कायदा असावा हे जनसंघापासून ते भारतीय जनता पक्षापर्यंतच्या आमच्या निवडणूक जाहीरनाम्याचा भाग आहे. त्यावेळी आम आदमी हा पक्ष नव्हताच. शिवाय काँग्रेसकडून पहिल्यापासूनच याला विरोध केला जातोय. काँग्रेसने पहिल्यापासून तुष्टीकरणाचे राजकारण केले आहे. राज्यघटनेत कलम 44 अन्वये गार्डियन प्रिंसिपल दिले गेले आहे, ज्यामध्ये राज्यघटनेच्या रचनाकारांची अशी अपेक्षा होती की भविष्यात देशाच्या संसदेने, देशाच्या विधिमंडळांनी समान नागरी कायदा आणावा. समान नागरी कायद्याच्या माध्यमातून संपूर्ण देशात धर्माच्या आधारावर कोणताही कायदा नसावा. कलम 14 आणि कलम 15 दोन्ही स्पष्ट करतात की कोणत्याही व्यक्तीला समान वागणूक दिली पाहिजे. धर्माच्या आधारावर कुणालाही विशेष वागणूक मिळू नये, कुणावर अन्याय होऊ नये.
द्वारकासारख्या पवित्र ठिकाणी ज्या प्रकारे अनधिकृत दडपशाही झाली, हे वास्तव आहे. ते तोडण्याची गरज होती. मी गुजरात सरकार, त्यांचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे मनापासून अभिनंदन करतो. भूपेंद्रभाई आणि हर्षभाई त्यांनी दबाव झुगारून दडपशाही मोडीत काढली. विरोध करणार्यांना मला एवढेच विचारायचे आहे की, यात चुकीचे काय आहे? तुमचा विरोध तुमच्या व्होट बँकेसाठी आहे की कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आहे? हे गुजरातच्या जनतेसमोर स्पष्ट केले पाहिजे. जे लोक समान नागरी कायद्याला विरोध करत आहेत त्यांना देखील माझा प्रश्न आहे की, तुमच्या विरोधाचे कारण गुजरातच्या जनतेसमोर ठेवा. आपल्या राज्यघटनेतच सर्व धर्म समभाव म्हटले आहे. त्यामुळे धर्माच्या आधारे कायदा कसा काय असू शकतो? धर्माच्या नावाखाली होणारे अतिक्रमण ही कोणत्याही प्रकारे कायदेशीर बाब नाही. निदान गुजरातमध्ये तरी हे चालणार नाही.
म्हणजे ड्रग्ज पकडायला विरोध आहे काय?
गुजरातमध्येच नव्हे तर देशभरात अमली पदार्थ जप्त होत आहेत. गेल्या तीन वर्षांची आकडेवारी पाहा. गुजरात नैसर्गिकरीत्या समुद्रकिनारी वसले आहे. समुद्रातून गुजरात आणि इतर राज्यांमध्ये जाणारे ड्रग्ज गुजरात एटीएसची टीम पकडते. ही टीम भारतातील कायद्याची अंमलबजावणी करते.
नाही हे सर्वत्र होत आहे. विरोधकांना बघायला वेळ नाही. फक्त गुजरातमध्चे नाही तर इतर ठिकाणी देखील ड्रग्ज पकडले तरी त्यात गैर ते काय? राज्य सरकारचे कर्तव्य असून गुजरातच्या जनतेने दिलेली जबाबदारी आहे. ड्रग्ज माफियांवर कडक कारवाई करून ड्रग्जमुक्त गुजरात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
गुजरातची संघटना संपूर्ण देशाच्या भारतीय जनता पक्षाच्या संघटनेत एक नमुना संघटना आहे. नरेंद्र मोदी येथे संघटना मंत्री असताना प्रथमच त्यांचे लेखापरीक्षण होऊन पुन्हा कागदोपत्री काम सुरू झाले. आता काळ पुढे सरकत असताना गुजरातने आपली संघटना अधिक मजबूत करण्याचे काम केले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे 1990 पासून आजतागायत भारतीय जनता पक्ष गुजरातमध्ये एकही निवडणूक हरलेला नाही.
बूथ कार्यकर्त्यापासून नरेंद्र मोदींपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि निष्ठेने सरकार चालवताना केलेल्या चांगल्या कामाचे फळ भाजपला मिळेल. त्यामुळे प्रचंड बहुमताने जुना विक्रम मोडीत काढत भारतीय जनता पक्ष 2022 च्या निवडणुका पुन्हा जिंकेल.
भूपेंद्रभाईंच्या नेतृत्वाखाली निवडणुका होत आहेत. गुजरातची जनता त्यांच्यावर शिक्कामोर्तब करेल. ते बदलण्यात काय अर्थ आहे?
गुजरातमध्ये तिसऱ्या पक्षाला स्थान आहे यावर माझा विश्वास नाही.
मोफत शिक्षण देऊ देण्याची कोणीतरी अलीकडे घोषणा केली. परंतु, 1960 पासून गुजरातमध्ये शिक्षण मोफत आहे. ज्याप्रकारे गुजरातमध्ये विकास झाला आहे, गुजरातमध्ये तुम्हाला ज्या प्रकारचे निकाल मिळाले आहेत, देशातील गुजरात सोडा, 370 ची कलम नरेंद्र मोदी इतक्या खंबीरपणे उखडून टाकतील याची कल्पनाही देशात कोणीही करू शकत नाही.
भारतीय जनता पक्षाचा सर्वात मोठा संकल्प हा आहे की, जगात देशाने प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर राहावे.