एक्स्प्लोर

सर्वात जास्त अविश्वास ठराव काँग्रेसच्या विरोधात, आतापर्यंतचा इतिहास काय?

भारतीय संसदेच्या इतिहासात आतापर्यंत 26 वेळा अविश्वास ठराव आला आहे. प्रत्येक अविश्वास ठरावाचं कारण वेगवेगळं असलं तरी यामध्ये मोरारजी देसाई यांचं सरकारही कोसळलेलं आहे. आता मोदी सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास ठराव आणला आहे.

मुंबई : देशाच्या संसदीय इतिहासातील पहिला अविश्वास ठराव 1963 मध्ये  पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या सरकारविरोधात प्रजा सोशलिस्ट पार्टीच्या जे.बी. कृपलाणी यांनी आणला होता. नेहरु सरकार 347 मतांनी जिंकलं, तर विरोधात 62 मतं होती. लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असताना तीन वर्षांच्या कार्यकाळात तीन वेळा अविश्वास प्रस्ताव आणला गेला. मात्र शास्त्री सरकारने जिंकण्याची हॅटट्रिक केली. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या पहिल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात दोन वेळा आणि त्यानंतर 13 वेळा अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागला. भारतीय संसदीय इतिहासात सर्वाधिक म्हणजे 15 वेळा अविश्वास ठराव इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात आले आणि दरवेळी इंदिरा गांधी यशस्वी ठरल्या. अविश्वास ठरावाला पहिले यश जनता पार्टी सत्तेत असताना मोरारजी देसाई यांच्या सरकारविरोधात 1978 मध्ये मिळाले. मोरारजींच्या कार्यकाळात दोन वेळा अविश्वास ठराव आले, त्यापैकी दुसऱ्यांदा आलेल्या अविश्वास ठरावाच्या वेळी त्यांच्याच खासदारांमधील फुटीने घात केला. मोरारजींनी पराभवाची चाहूल लागताच 15 जुलै 1979 रोजी राजीनामा दिला. काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पाठिंब्याने जनता दल (एस) चे नेते चौधरी चरणसिंह यांनी 28 जुलै 1979 रोजी सरकार स्थापन केलं. तत्कालिन राष्ट्रपती निलम संजीव रेड्डींनी त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 20 ऑगस्टची मुदत दिली गेली. मात्र 19 जुलैला इंदिरा गांधींनी चरणसिंह सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी पाठिंबा देणार नसल्याचं जाहीर केलं. एकदाही लोकसभेला सामोरे न जाता राजीनामा दिलेले पहिले पंतप्रधान म्हणून चौधरी चरणसिंह यांचं नाव इतिहासात नोंदवलं गेलं. 1989 मध्ये विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय मोर्चाला 146 जागी विजय मिळाला. त्यांनी भाजपचे 86 आणि डाव्या पक्षांच्या 52 खासदारांच्या पाठिंब्याच्या बळावर सरकार स्थापन केलं. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी मंडल आयोगाच्या अहवालावर अंमलबजावणी सुरु करताच त्यांच्या सरकारविरोधात असंतोष उफाळू लागला. मात्र सरकार पडण्यासाठी कारण ठरले ते अयोध्या आंदोलनाचे. राम मंदिरासाठी देशभर रथयात्रेवर असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना बिहारमध्ये झालेल्या अटकेचे . देशातील पहिले आघाडी सरकार 10 नोव्हेंबर 1989 रोजी पराभूत झाले. नरसिंहराव पंतप्रधान असतानाही तीन वेळा अविश्वास प्रस्ताव सादर झाला. संसदीय इतिहासात सर्वाधिक कमी म्हणजे 14 मतांच्या अंतराने त्यांचेच सरकार वाचले होते. सरकार वाचवण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना लाच दिल्याच्या आरोपामुळे त्यांचेच सरकार वादाच्या भोवऱ्यातही सापडले होते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या सरकारला तीन वेळा अविश्वास ठरावाच्या अग्निपरीक्षेला तोंड द्यावे लागले. पहिल्यांदा 1996 मध्ये अविश्वास ठराव आला तेव्हा ते सरकार वाचवू शकले नाही. तेरा दिवसात ते माजी झाले. दुसऱ्यांदा ते 13 महिने सत्तेवर राहिले. 1998 मध्ये सत्तेवर आल्यानंतर 1999 मध्ये जयललितांच्या अण्णा द्रमुकने त्यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. एका मताने त्यांचे सरकार पडले. 2003 मध्ये तिसऱ्यांदा त्यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आला तेव्हा त्यांच्या समर्थनार्थ 312 तर विरोधात फक्त 186 खासदार असल्याचं स्पष्ट झालं. 1997 मध्ये अनपेक्षितरीत्या सत्तेवर आलेले एच.डी.देवेगौडा यांच्या सरकारचा पाठिंबा काँग्रेसने काढून घेतल्याने ते सरकार पडले. तसेच इंद्रकुमार गुजराल यांच्या सरकारच्याबाबतीतही घडले. काँग्रेसच्या विरोधानंतर त्यांना बहुमत सिद्ध करणे शक्य झाले नाही. 2008 मध्ये पंतप्रधानपदी मनमोहन सिंह असताना संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागला. त्यांच्या सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या अणुकरारामुळे हा प्रस्ताव आणला गेला होता. मात्र, मनमोहन सिंह यांच्या फ्लोअर मॅनेजरनी सरकार वाचवण्यात यश मिळवले. आता पाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची आहे. सरकार सत्तेवर आलं तेव्हा सहकारी पक्ष असणाऱ्या तेलुगू देसमने त्यांच्या सरकारविरोधात अविश्वास ठराव आणलाय. शुक्रवारी 20 जुलै रोजी त्यावर सात तास चर्चा आणि मग मतदान होईल. एकट्या भाजपाकडे लोकसभेत 273 खासदारांचं बहुमत आहे. त्या जोडीला 18 खासदार असलेल्या शिवसेनेने सरकारच्या बाजूने मतदानासाठी पक्षादेश जारी केल्याने आता भाजपचे पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मिळवलेल्या 312 पेक्षाही जास्त मतांनी नरेंद्र मोदी यांचे सरकार विजयी होईल. अर्थात सात तास चालणाऱ्या या चर्चेचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने होणार आहे. त्यांचे ते भाषण आगामी निवडणुकांच्या भाजप प्रचाराचा बिगुल फुंकणारेच असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Embed widget