पाकिस्तानात मंदिर तोडफोड प्रकरणी 26 जणांना अटक, पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता
पाकिस्तानच्या हिंदू मंदिरात विध्वंस आणि जाळपोळीची दखल घेत पाकिस्तानचे सरन्यायाधीश गुलजार अहमद यांनी या प्रकरणाची सुनावणी 5 जानेवारी रोजी ठेवली आहे.
![पाकिस्तानात मंदिर तोडफोड प्रकरणी 26 जणांना अटक, पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता hindu temple demolishing in pakistan khyber pakhtunkhwa cji takes notice 26 people arrested पाकिस्तानात मंदिर तोडफोड प्रकरणी 26 जणांना अटक, पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/31222821/Pak.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कराची : वायव्य पाकिस्तानमधील मंदिराच्या दुरुस्तीच्या कामाचा निषेध करत मंदिराची तोडफोड करुन पेटवून देण्यात प्रकार समोर आला. कट्टरपंथी इस्लामी पक्षाच्या 26 सदस्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. खैबर पख्तूनख्वामधील करक जिल्ह्यातील टेरी गावात मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर जमीअत उलेमा-ए-इस्लाम पक्षाचे नेते रहमत सलाम खट्टक यांच्यासह 26 जणांना अटक करण्यात आली आहे, असं पोलीस प्रभारी रहमतुल्ला खान यांनी पीटीआयला सांगितले.
जमीयत उलेमा-ए-इस्लाम पक्षाच्या समर्थकांच्या नेतृत्वातील (फजल उर रहमान ग्रुप) गर्दीने मंदिर विस्ताराच्या कामाला विरोध केला आणि जुनी रचना तसेच नव्याने बांधलेल्या बांधकामाची तोडफोड केली.
5 जानेवारीला पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
पाकिस्तानच्या हिंदू मंदिरात विध्वंस आणि जाळपोळीची दखल घेत पाकिस्तानचे सरन्यायाधीश गुलजार अहमद यांनी या प्रकरणाची सुनावणी 5 जानेवारी रोजी ठेवली आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नॅशनल असेंब्लीचे सदस्य आणि पाकिस्तान हिंदू परिषदेचे प्रमुख रमेश कुमार यांना बोलावले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कराची रजिस्ट्रीमध्ये त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली.
करक जिल्ह्यातील मानवी हक्क कार्यकर्ते आणि अल्पसंख्याक हिंदू समाजाने या घटनेचा निषेध केला आहे. पाकिस्तानमधील मानवाधिकार संघराज्याचे संसदीय सचिव लालचंद मल्ही यांनी या हल्ल्याची तीव्र टीका केली आहे. ते म्हणाले की, काही लोक पाकिस्तानला बदनाम करण्यासाठी असे असामाजिक उपक्रम करत आहेत, जे सरकार अजिबात सहन करणार नाही.
अनेक लोकांनी या घटनेला लज्जास्पद ठरवत निषेध केला आहे. हा नवा पाकिस्तान आहे, असं म्हणत या घटनेची निंदा केली गेलीय तसेच देशातील धार्मिक अल्पसंख्यांकांसोबत कशाप्रकारे व्यवहार केला जात आहे, याबाबत सवाल केले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)