एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या पूजा पांडेयला बेड्या
उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये महात्मा गांधींच्या 71 व्या पुण्यतिथीला (30 जानेवारी 2019) पूजा पाण्डेय हिने महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्या होत्या. पूजा ही हिंदू महासभेची राष्ट्रीय सचिव आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या पूजा पांडेय हिला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दिल्ली-नोएडा सीमेवरील नोएडा सेक्टर 14 A मध्ये अलीगढ पोलिसांनी पूजा आणि तिचा पती अशोक पांडेय यांना अटक केली.
उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये महात्मा गांधींच्या 71 व्या पुण्यतिथीला (30 जानेवारी 2019) पूजा पाण्डेय हिने महात्मा गांधींचा अवमान केला होता. पूजा ही हिंदू महासभेची राष्ट्रीय सचिव आहे.
महात्मा गांधींच्या प्रतिमेची प्रतिकात्मक हत्या करण्याचं कृत्य या विकृतांनी केल्यानंतर अवघ्या देशभरात संतापाची लाट उसळली होती. अनेकांकडून पूजा पाण्डेयच्या कृतीचा निषेध केला जात होता.
काय आहे प्रकरण?
नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली होती, तोच प्रसंग उभा करण्यासाठी अलीगढमध्ये हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी बापूजींच्या प्रतिमेलाच गोळ्या घातल्या. या विकृतीचा व्हिडिओ समोर आला आहे.
नथुराम गोडसेने गांधीजींना जितक्या गोळ्या घातल्या, तितक्याच म्हणजे तीन गोळ्या पूजा पाण्डेयने घातल्या. याशिवाय हत्या खरी वाटावी म्हणून विकृतांनी प्रतिमेखाली रक्तही ओतलं होतं. त्यानंतर महात्मा गांधींची प्रतिमा या विकृतांनी पेटवून दिली. ज्या नथुरामने महात्मा गांधींची हत्या केली, त्याचा जयजयकारही यावेळी करण्यात आला.
व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
निवडणूक
Advertisement