एक्स्प्लोर

हिमाचल प्रदेशातील 'या' गावात एक व्यक्ती सोडून इतर सर्व कोरोना पॉझिटिव्ह; पर्यटकांना बंदी

हिमाचल प्रदेशमधील लाहौल खोऱ्यातील थोरंग गावात एक व्यक्ती सोडून इतर सर्वजणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या सर्वांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मनाली-लेह महामार्गावर असलेल्या थोरंग गावात केवळ 42 लोक राहतात.

लाहौल : उत्तर भारतात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच कोरोनाचा प्रादुर्भावही वाढताना दिसत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. अशात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हिमाचल प्रदेशमधील लाहौल खोऱ्यातील थोरंग गावात एक व्यक्ती सोडून इतर सर्वजणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या सर्वांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मनाली-लेह महामार्गावर असलेल्या थोरंग गावात केवळ 42 लोक राहतात. ज्यावेळी गावातील सर्वांनी कोरोनाची चाचणी केली, त्यावेळी त्या गावातील 42 लोकांपैकी 41 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

सर्वात आधी 52 वर्षांच्या भूषण ठाकूर यांनी आपली कोरोना चाचणी केली होती. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गावातील इतरांनीही कोरोना चाचणी केली. त्यानंतर केवळ एक व्यक्ती सोडून गावातील इतर सर्व व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे सध्या लाहौल हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक कोरोना बाधित असलेला जिल्हा बनला आहे.

लाहौल खोऱ्यातील वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना बंदी घातली आहे. रोहतांग सुरंगच्या उत्तरेकडील तेलिंग पर्यंतच पर्यटकांना येण्यासाठी परवानगी देण्याक आली आहे.

स्पीति खोऱ्यात 39 लोकांना कोरोनाची बाधा

हिमाचल प्रदेशमध्ये याआधी लाहौल-स्पीति जिल्ह्यातील सुदूर स्पीति घाटीमध्ये रंग्रिकच्या 39 रहिवाशांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून अधिकाऱ्यांनी गावाच्या सर्व सीमा बंद केल्या होत्या.

दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये गुरुवारी कोरोनाच्या 12 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा 481 वर पोहोचला आहे. तर 796 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांचा आकडा 32,198 वर पोहोचला आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, कांगडा-कुल्लूमध्ये तीन-तीन, मंडी-शिमलामध्ये प्रत्येकी दोन आणि ऊना व बिलासपूरमध्ये प्रत्येकी एका-एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget