Himachal Election : हिमाचल प्रदेशमध्ये आज निवडणूक, 56 लाख मतदार घेणार 412 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय
Himachal Pradesh Election : हिमाचल प्रदेशात प्रत्येक वेळी सत्ता बदलाचा इतिहास आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटलं होतं की, यंदा लोक पुन्हा एकदा भाजप सरकारलाच निवडून देतील.
HP Assembly Election 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये ( Himachal Pradesh ) विधानसभेच्या 68 जागांसाठी ( Assembly Election ) आज मतदान होत आहे. राज्यातील एकूण 7884 मतदान केंद्रांवर सकाळी 8 आठ वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या 412 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय सुमारे 56 लाख मतदार घेणार आहेत. या निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये एकूण 55,92,828 मतदार आहेत. यामध्ये 28,54,945 पुरुष तर 27,37,845 महिला मतदार आहेत. याशिवाय 38 तृतीयपंथी मतदारही मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याआधी 2017 हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत 75.57 टक्के मतदान झाले होते.
हिमाचल प्रदेशामध्ये सत्ता बदलाचा इतिहास
हिमाचल प्रदेशात सत्ता बदलाचा इतिहास आहे. हिमाचल प्रदेशातील सत्ताधारी भाजप या विधानसभा निवडणुकीत विकासाच्या अजेंड्यावर निवडणुक लढवत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सांगितलं होतं की, यंदा लोक पुन्हा एकदा भाजप सरकारलाच निवडून देतील. हिमाचल प्रदेशमध्ये भाजप इतिहास रचेल.
Himachal Assembly polls: A look at key players, constituencies in hill state
— ANI Digital (@ani_digital) November 11, 2022
Read @ANI Story | https://t.co/YeZ36JetCc#HimachalPradeshElections #HimachalElection2022 #HimachalPradesh pic.twitter.com/0lKtPfYgSY
बंदोबस्तासाठी 35000 सुरक्षा दल तैनात
हिमाचल प्रदेशात शांततेत मतदान पार पडावं यासाठी राज्यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) तैनात करण्यात आलं आहे. सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी 35000 केंद्रीय सुरक्षा दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. राज्यातील अनेक उंच पर्वतीय भागात बर्फवृष्टी झाली आहे, त्यामुळे या भागातील लोकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यात अडचण येऊ शकते.
68 मतदारसंघातील 412 उमेदवारांचे भवितव्य ठरणार
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह आणि भाजपचे माजी प्रमुख सतपाल सिंह सत्ती यांच्यासह 68 मतदारसंघातील 412 उमेदवारांचे भवितव्य राज्यातील 55 लाखांहून अधिक मतदार ठरवणार आहेत. या निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहे.
काँग्रेसची अस्तित्वासाठी लढाई
मागील दोन निवडणुकांमध्ये वाईट कामगिरी करणाऱ्या काँग्रेससाठी हिमाचल प्रदेशमधील लढाई अस्तित्वाची आहे. काँग्रेससाठी ही निवडणूक अधिक महत्त्वाची आहे, कारण 24 वर्षानंतर गांधी घराण्याव्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीच्या हाती काँग्रेस सुत्रे दिली आहेत आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी प्रचारापासून पूर्णपणे दूर राहिले आहेत.
मागील दोन निवडणुकांमध्ये वाईट कामगिरी करणाऱ्या काँग्रेससाठी हिमाचल प्रदेशमधील लढाई अस्तित्वाची आहे. काँग्रेससाठी ही निवडणूक अधिक महत्त्वाची आहे, कारण 24 वर्षानंतर गांधी घराण्याव्यतिरिक्त दुसऱ्ा व्यक्तीच्या हाती काँग्रेस सुत्रे दिली आहेत आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी प्रचारापासून पूर्णपणे दूर राहिले आहेत.