एक्स्प्लोर

अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील आयबी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, अंतर्गत सुरक्षेसह 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत देशभरातील इंटेलिजन्स ब्युरो (IB) अधिकाऱ्यांची एक दिवसीय उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  (Amit Shah)  यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत (Delhi) देशभरातील इंटेलिजन्स ब्युरो (IB) अधिकाऱ्यांची एक दिवसीय उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत देशाची अंतर्गत सुरक्षा परिस्थिती, दहशतवादाचा धोका यासह केंद्र आणि राज्य यंत्रणांमध्ये समन्वयाची गरज, यावर चर्चा झाली. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, गृहमंत्री अमित शाह देशातील मजबूत अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी या बैठकीत दहशतवाद, अंतर्गत सुरक्षा, गुप्तचर माहिती गोळा करणार्‍या नेटवर्कसह इतर महत्वाच्या गोष्टींचा आढावा घेतील. याबाबतच माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, या बैठकीला देशभरातील गुप्तचर मुद्द्यांशी संबंधित अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांच्याशिवाय केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला आणि आयबी प्रमुख तपन डेका यांनीही बैठकीला हजेरी लावली.

तत्पूर्वी, मागील महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  (Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखाली हरियाणातील सूरजकुंड येथे देशभरातील गृहमंत्र्यांसह दोन दिवसीय चिंतन शिवार आयोजित करण्यात आले होते. गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिरात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये अनेक मुद्यांवर सहमती झाली. यामध्ये बिहार आणि झारखंड नक्षलमुक्त करणे, अंतर्गत सुरक्षेवर एकत्र काम करणे, फॉरेन्सिक तपास, सायबर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या गुन्हेगारांना पकडणे, दहशतवाद, अंमली पदार्थांचे व्यवहार आणि इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. चिंतन शिबिरात सांगण्यात आले की, 2047 च्या आराखड्यांतर्गत केंद्र व राज्यांनी एकत्र काम करावे. ईशान्येत गेल्या 8 वर्षात 9200 सशस्त्र नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचेही चिंतन शिवारात सांगण्यात आले.

दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी (7 नोव्हेंबर) आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. यात दावा करण्यात आला आहे की, 2021 देशाची अंतर्गत सुरक्षा परिस्थिती नियंत्रणात राहिली. देशातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवणे ही केंद्र सरकारची पहिली प्राथमिकता आहे. केंद्राने अंतर्गत सुरक्षेला प्राधान्य दिले आहे आणि त्यामुळे भारताची अंतर्गत स्थिती मजबूत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Sanjay Raut Bail: ईडीची जामीन स्थगितीची मागणी नाकारली, संजय राऊत यांची आजच सुटका, कार्यकर्त्यांचा जल्लोष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget