एक्स्प्लोर
मोदी आणि जपानच्या पंतप्रधानांचा आज रोड शो, शिंजो आबेंचा भारत दौरा
मोदी आणि आबे यांच्या हस्ते उद्या गुरुवारी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली: जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. दोन्ही दिवस ते गुजरातमध्येच राहणार आहेत. मोदी आणि आबे यांच्या हस्ते उद्या गुरुवारी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात येणार आहे. भारत-चीन डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर आबे यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. गेल्या 3 वर्षांत मोदी आणि आबे यांनी 10 वेळा एकमेकांची भेट घेतली आहे. अहमदाबादला नवरीसारखं नटवलं शिंजो आबे यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद शहराला नवरीसारखं नटवण्यात आलं आहे. रात्री साबरमती नदीकिनारा तिरंग्याच्या झगमगाटात पाहायला मिळाला. नदी किनारी भारत-जपान मैत्री दाखवण्यासाठी दोन्ही देशांचे झेंडे मोठ्या एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात आले. केवळ साबरमती नदीच नव्हे तर संपूर्ण अहमदाबाद शहर रंग-बिरंगी प्रकाशाने लखलखून गेलं आहे.
अहमदाबादेत रोड शो जपानचे पंतप्रधान शिंजो आबे दुपारी साडेतीनच्या सुमारास अहमदाबादेतील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर दाखल होतील. इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं स्वागत करतील. इथूनच मोदी आणि आबे यांच्या ऐतिहासिक रोड शोला सुरुवात होईल. दोन देशांचे पंतप्रधान रोड शो करण्याची ही जगातील कदाचित पहिली घटना असेल. 8 किमी रोड शोदरम्यान भारतीय संस्कृतीची विविधता दाखवण्यात येईल. 28 राज्यांच्या कलाकारांचा समावेश मोदी आणि आबे यांच्या रोडशोदरम्यान 28 छोटे छोटे स्टेज उभारण्यात आले आहेत. इथे 28 राज्यांचे कलाकार पारंपारिक वेशभूषेत आपल्या कला सादर करतील. रोड शोचा शेवट साबरमती आश्रमाजवळ होईल. संध्याकाळी साडेचार वाजता मोदी आणि आबे हे साबरमती आश्रमाला भेट देतील, जिथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. यानंतर ते सिद्दी सैय्यद मस्जिदीला भेट देतील. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी शिंजो आबे यांच्या हस्ते भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचं उद्घाटन करण्यात येईल. शिंजो आबे यांचा भारत दौरा बुधवार, 13 सप्टेंबर 2017 दुपारी 3.30 वा - अहमदाबादेतील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर आगमन दुपारी 4.30 वा - साबरमती आश्रमाला भेट संध्या. 6.15 वा. - सिदी सैय्यद मस्जिदीला भेट गुरुवार 14 सप्टेंबर 2017 सकाळी 9.50 वा. - भारतातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद- मुंबईचं उद्घाटन सकाळी 11.30 वा. - दांडी कुतीरला भेट दुपारी 12 वा. - उच्चस्तरीय चर्चा दुपारी 1. वा - दोन्ही देशात करार आणि पत्रकार परिषद, स्थळ- महात्मा मंदिर दुपारी 2.30 वा- भारत-जपान बिझनेस लिडर ग्रुप फोटो दुपारी 3.45 वा - महात्मा मंदिरातील कॉन्व्हेंन्शन हॉलमधील प्रदर्शन पाहणी रात्री 9.35 वा. - शिंजो आबे टोकियोला रवाना होणार
अहमदाबादेत रोड शो जपानचे पंतप्रधान शिंजो आबे दुपारी साडेतीनच्या सुमारास अहमदाबादेतील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर दाखल होतील. इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं स्वागत करतील. इथूनच मोदी आणि आबे यांच्या ऐतिहासिक रोड शोला सुरुवात होईल. दोन देशांचे पंतप्रधान रोड शो करण्याची ही जगातील कदाचित पहिली घटना असेल. 8 किमी रोड शोदरम्यान भारतीय संस्कृतीची विविधता दाखवण्यात येईल. 28 राज्यांच्या कलाकारांचा समावेश मोदी आणि आबे यांच्या रोडशोदरम्यान 28 छोटे छोटे स्टेज उभारण्यात आले आहेत. इथे 28 राज्यांचे कलाकार पारंपारिक वेशभूषेत आपल्या कला सादर करतील. रोड शोचा शेवट साबरमती आश्रमाजवळ होईल. संध्याकाळी साडेचार वाजता मोदी आणि आबे हे साबरमती आश्रमाला भेट देतील, जिथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. यानंतर ते सिद्दी सैय्यद मस्जिदीला भेट देतील. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी शिंजो आबे यांच्या हस्ते भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचं उद्घाटन करण्यात येईल. शिंजो आबे यांचा भारत दौरा बुधवार, 13 सप्टेंबर 2017 दुपारी 3.30 वा - अहमदाबादेतील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर आगमन दुपारी 4.30 वा - साबरमती आश्रमाला भेट संध्या. 6.15 वा. - सिदी सैय्यद मस्जिदीला भेट गुरुवार 14 सप्टेंबर 2017 सकाळी 9.50 वा. - भारतातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद- मुंबईचं उद्घाटन सकाळी 11.30 वा. - दांडी कुतीरला भेट दुपारी 12 वा. - उच्चस्तरीय चर्चा दुपारी 1. वा - दोन्ही देशात करार आणि पत्रकार परिषद, स्थळ- महात्मा मंदिर दुपारी 2.30 वा- भारत-जपान बिझनेस लिडर ग्रुप फोटो दुपारी 3.45 वा - महात्मा मंदिरातील कॉन्व्हेंन्शन हॉलमधील प्रदर्शन पाहणी रात्री 9.35 वा. - शिंजो आबे टोकियोला रवाना होणार आणखी वाचा























