एक्स्प्लोर
Advertisement
श्रीनगर, शिमलामध्ये तुफान बर्फवृष्टी, राष्ट्रीय महामार्ग बंद
श्रीनगर/शिमला : शिमला आणि श्रीनगरमध्ये सलग दोन दिवसांपासून तुफान बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे जम्मू-श्रीनगरसह राष्ट्रीय महामार्गावर अनेक महत्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहेत.
शिमला, कुलू, किन्नोर इथंही बर्फवृष्टी झाल्यान अनेक पर्यटक अडकून पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल श्रीनगरमध्ये विक्रमी बर्फवृष्टी झालीय. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूही मिळणं कठिण झाल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
तब्बल 4 इंचापर्यंतचा बर्फाचा खच रस्त्यांवर जमलेला होता. पुढच्या 48 तासापर्यंतही हवामान स्थितीत कोणतीही सुधारणा होणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
दरम्यान उत्तराखंडमध्येही बर्फवृष्टी होत आहे. देहरादूनमध्ये सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुले पर्यटक, नागरिक यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement