एक्स्प्लोर

Weather Update : उत्तर भारतात मुसळधार पाऊस, उत्तर प्रदेशात शेती पिकांना मोठा फटका; आजही पावसाचा इशारा

Weather Update : देशाच्या विविध भागात जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. विशेषत: उत्तर भारतात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे.

Weather Update : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार देशाच्या विविध भागात जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. विशेषत: उत्तर भारतात (North India) जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही भागात या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान  हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार जम्मू आणि काश्मीरमध्ये 9 जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर काही ठिकाणी पूर आणि भूस्खलनाचा इशारा देण्यात आला असून, त्यामुळं अमरनाथ यात्रेच्या मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होणार आहे.

Rain : मुसळधार पावसामुळं अमरनाथ यात्रेतही व्यत्यय येण्याची शक्यता

जम्मू विभागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर या कालावधीत काश्मीर विभागात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळं अमरनाथ यात्रेतही व्यत्यय येण्याची शक्यता आहे. नद्यांसह स्थानिक नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं अचानक पूर येऊ शकतो, पाणी साचू शकते. अतिसंवेदनशील ठिकाणी दरड कोसळणे, खडक कोसळणण्याचा धोकाही असू शकतो.

उत्तर प्रदेशात मुसळदार पाऊस, शेती पिकांना मोठा फटका 

उत्तर प्रदेशात गेल्या अनेक दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळं वाढत्या उष्णतेपासून लोकांना दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांना मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेकांसाठी हा मोसमी पाऊस अडचणीचा ठरला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील दोन-तीन दिवसांत पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून इतर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पंजाब हरियाणामध्ये मुसळधार पाऊस

हरियाणा आणि पंजाबमध्ये मान्सूनने आता वेग पकडला आहे. पंजाबमधील 12 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. लुधियानामध्ये पावसाने 50 वर्षांचा विक्रम मोडला आहे. त्याचबरोबर पावसामुळे अनेक शहरांमध्ये पाणी तुंबले आहे. दुसरीकडे, हरियाणातील 18 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला, ज्यामध्ये कैथलमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. मान्सूनच्या पावसामुळे पंजाबच्या तापमानात 8 अंश सेल्सिअसची घसरण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : आत्तापर्यंत राज्यात 20.60 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, दुष्काळ निवारणासह खरीपा संदर्भास बैठक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्लाUddhav Thackeray : सत्तारांची गुंडगिरी मोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget