(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weather Updates : महाराष्ट्रासह देशातील 25 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Weather Updates : देशातील 25 राज्यांमध्ये दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं (IMD) दिला आहे.
Weather Updates : देशातील वातावरणात बदल (Climate Change) झाला आहे. सध्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. या मुसळधार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम होत आहे, तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, देशातील 25 राज्यांमध्ये दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं (IMD) दिला आहे. तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत तीन जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
आसाम राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. बारपेटा इथं पावसाने कहर केला आहे. आसासमध्ये काही भागात दरडी कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तर कुठं पुरसदृश्य स्थिती आहे. वादळी पावसानं हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये देखील धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहान हवामान विभागानं केलं आहे.
या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याने देशाच्या उत्तर ते दक्षिणेकडे 25 राज्यांमध्ये दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळम या राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
सतलज नदीच्या पाणी पातळीत वाढ
सध्या सुरु असलेलया मुसळधार पावसामुळं हिमाचल प्रदेशातील परिस्थिती बिकट झाली आहे. राज्यात सतलज नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळं नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. तसेच मध्य प्रदेशातील 8 जिल्ह्यांमध्ये 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दुसरीकडे, हवामान खात्याने छत्तीसगडमधील 6 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट
राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं (Heavy rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचं चित्र दिसत आहे. राज्यात सुरु झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील इतर भागातही चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: