एक्स्प्लोर
Advertisement
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी NEET नको, आरोग्य मंत्रालयाचा प्रस्ताव
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वैद्यकीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आरोग्य मंत्रालय कॅबिनेटसमोर पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी द्यावी लागणारी NEET ची परीक्षा बंद करण्याचा प्रस्ताव मांडणार आहे
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वैद्यकीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आरोग्य मंत्रालय कॅबिनेटसमोर पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी द्यावी लागणारी NEET ची परीक्षा बंद करण्याचा प्रस्ताव मांडणार आहे. एमडी आणि एमएससाठी प्रवेश घेण्याकरता केवळ एमबीबीएसची परीक्षा पुरेशी आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय चिकित्सा आयोगाच्या (एनएमसी) विधेयकामधील संशोधनानुसार नॅशनल एक्जिट टेस्टमधील (एनएक्सटी) गुणांच्या आधारावर पदव्युत्तर कोर्सेसमध्ये प्रवेश घेता येईल. त्यामुळे एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पदव्युत्तर कोर्सेसमध्ये (उदा. एमडी, एमएस) प्रवेश घेता येईल. तसेच
विद्यार्थ्यांना प्रॅक्टिसकरिता परवाना मिळवण्यासाठी वेगळी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. परंतु भारतीय आयुर्विज्ञान संस्थानमध्ये (एम्स) प्रवेश घेण्यासाठी वेगळी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यासोबतच डीएम/एमसीएच मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नीट-सुपर स्पेशालिटीची (neet superspeciality) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement