एक्स्प्लोर

नोटांमुळे टीबी, अल्सरसारखे आजार, व्यापारी संघटनेचा दावा

कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने यासंदर्भात अर्थमंत्री अरुण जेटलींना पत्र देण्यात आले असून, उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आलीय.

नवी दिल्ली : तुमच्या खिशात असलेल्या नोटा या तुम्हाला गंभीर आजारी पाडण्यासाठी कारणीभूत आहेत, असा संशय निर्माण झाला आहे. या नोटांच्या संपर्कामुळे टीबी आणि अल्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात, असा दावा दिल्लीतल्या एका व्यापारी संघटनेने केला आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने यासंदर्भात अर्थमंत्री अरुण जेटलींना पत्र दिले असून, उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आलीय. चलनी नोटा अनेकजण हाताळत असतात, अशावेळी त्यावर अनेक प्रकारचे विषाणू चिकटतात. व्यापारी समाज आणि बँकेतले कर्मचारी हे या नोटांच्या संपर्कात सर्वाधिक येतात. त्यामुळे त्यांना या नोटांच्या संसर्गाचा धोका निर्माण होऊन माणसं आजारी पडण्याची शक्यता असते. या प्रकरणी अर्थमंत्रालयाने लक्ष घालून, यावर उपाय शोधण्याची मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने या दाव्याची आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना दखल घेण्याची विनंती केली आहे. व्यापारी संघटनांनी वेगवेगळ्या अहवालांच्या निष्कर्षांचा संदर्भ देत, नोटांवर बॅक्टेरिया आढळल्याचा दावा केला आहे. टीबी, अल्सर यांसारखे आजारही नोटांमुळे होऊ शकतात, असा दावाही या व्यापारी संघटनेनी केला आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी याबाबत सांगितले की, “खरंतर दरवर्षी अशाप्रकारचा अहवाल विज्ञान मासिकात प्रकाशित होत असतो. मात्र आरोग्यासंदर्भात कुणीही गंभीरपणे दखल घेत नाही. त्यात व्यापारी वर्ग छापील नोटा जास्तीत जास्त हाताळत असतात. त्यामुळे या अहवालातील माहिती जर खरी ठरली, तर व्यापाऱ्यांनाच ते घातक आहे.”
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget