एक्स्प्लोर
आरोग्य आणि वाहन विमा एक एप्रिलपासून महागण्याचे संकेत
नवी दिल्ली : जर तुम्ही आरोग्य विमा किंवा वाहन विमा काढण्याच्या विचारात असाल, तर जरा घाई करा. कारण 1 एप्रिल महिन्यापासून आरोग्य आणि वाहन विमा महागण्याची चिन्हं आहेत.
एजंटच्या कमिशनमध्ये वाढ करण्यासाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) नं हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे आरोग्य आणि वाहन विम्याचा प्रिमियम साधारण पाच टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता आहे.
‘थर्ड पार्टी’ वाहन विमा दरांमध्येही वाढ होणार असल्याने त्यावर वाढीव रक्कम आकारली जाईल. गेल्या काही दिवसांपासून विमा हप्त्याचे दर हे सातत्याने कमी होत आहेत; मात्र तुलनेत दाव्यांचे प्रमाण वाढत असून त्यापोटी कंपन्यांनाही मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागत आहे, असं समर्थन विमा दरवाढीसाठी करण्यात आलं आहे.
लतुम्ही एप्रिल आधीच विमा काढलात तर तुम्हाला सध्याच्या दरानुसार पैसे मोजावे लागतील, अन्यथा एप्रिलनंतर तुमच्याकडून वाढीव 5 टक्के आकारले जाऊ शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement