एक्स्प्लोर

Kotak Wealth Hurun Wealthy Women 2020 | रोशनी नाडर मल्होत्रा देशातील श्रीमंत महिला, एकूण संपत्ती किती?

Kotak Wealth and Hurun India च्या यादीनुसार एचसीएल टेक्नोलॉजीजच्या अध्यक्ष रोशनी नडार मल्होत्रा भारताच्या सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्यांची एकूण संपत्ती किती?

मुंबई : कोटक वेल्थ अॅण्ड हुरुन इंडियाने 2020 मधील देशातील 100 सर्वात श्रीमंत महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार एचसीएल टेक्नोलॉजीजच्या अध्यक्ष रोशनी नाडर मल्होत्रा भारताच्या सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्यांची एकूण संपत्ती 54,850 कोटी आहे. तर या यादीत 'द बायोकॉन'च्या किरण मजुमदार शॉ 36,600 कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत.

रोशनी या HCL चे संस्थापक शिव नाडर यांच्या कन्या रोशनी नाडर मल्होत्रा या एचसीएल कॉर्पोरेशनमध्ये कार्यकारी संचालक आणि सीईओ पदावर आहेत. यासोबतच एचसीएल टेक्नोलॉजीज बोर्डाच्या उपाध्यक्ष आणि शिव नाडर फाऊंडेशनच्या विश्वस्तही होत्या. 38 वर्षीय रोशनी नाडर मल्होत्रा, एचसीएलचे संस्थापक आणि अध्यक्ष शिव नाडर यांच्या कन्या आहेत. यंदा जुलै महिन्यात आयटीमधील अव्वल कंपनी असलेल्या एचसीएलने घोषणा केली होती, अध्यक्ष शिव नडार पद सोडायचं आहे. यानंतर शिव नाडर यांनी आपल्या साम्राज्याची धुरा रोशनी नाडर यांच्यावर सोपवली होती.

शिखर मल्होत्रा यांच्याशी विवाह वयाच्या 28 व्या वर्षी कंपनीच्या सीईओ बनलेल्या रोशनी नाडर मल्होत्रा यांचा जन्म दिल्लीत झाला आणि त्यांचं बालपणही तिथेच गेलं. त्यांनी वसंत व्हॅली स्कूलमध्ये सुरुवातीचं शिक्षण घेतलं. यानंतर अमेरिकेच्या नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पदवी मिळवली. याच विद्यापीठाच्या केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून रोशनी यांनी एमबीए पूर्ण केलं. रोशनी यांनी 2009 मध्ये एचसीएल कॉर्पमध्ये सामील होण्यापूर्वी यूकेतील स्काय न्यूज आणि अमेरिकेतील सीएनएनसोबत प्रोड्यूसर म्हणून काम केलं. 2010 मध्ये त्यांनी एचसीएल हेल्थकेअरचे उपाध्यक्ष शिखर मल्होत्रा यांच्याशी लग्न केलं. त्यांना अरमान आणि जहान ही दोन मुलं आहेत.

फोर्ब्सच्या 100 प्रभावी महिलांच्या यादीत रोशनी मल्होत्रांचा समावेश वाईल्ड लाईफ आणि कन्झर्वेशनमध्ये रस असलेल्या रोशनी नाडर मल्होत्रा यांनी 2018 मध्ये 'द हॅविट्स ट्रस्ट'ची स्थापना केली होती. यामागचा उद्देश हा देशातील निसर्गरम्य, नैसर्गिक स्थळं आणि स्वदेशी प्रजातींची सुरक्षा करण्याचा होता. 2019 मधील फोर्ब्सच्या जगातील सर्वात प्रभावी 100 महिलांच्या यादीतही रोशनी 54 व्या स्थानावर होत्या. या यादीत त्या 2017 ते 2019 अशा सलग तीन वर्ष होत्या.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Embed widget