Accident : तेराव्याची जेवणं आटोपून घराकडची वाट धरली, पण वाटेतच काळानं घाला घातला; भीषण अपघातात 15 जणांनी जीव गमावला
Hathras Accident : तेराव्याचे सोपस्कार आटोपून घरी परतणाऱ्या 15 जणांवर काळानं घाला घातला आहे. यामध्ये 15 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Hathras Accident : नवी दिल्ली : हरितालकेच्या दिवशी घडलेल्या भीषण अपघातानं (Accident Updates) संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एक भीषण रस्ता अपघात झाला, ज्यात 15 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेकजण गंभीर झाल्याचीही माहिती मिळत आहे. तसेच, या घटनेनं मृतांचा आकडा वाढण्याची भितीही व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी संध्याकाळी मॅक्स लोडर आणि रोडवेज बसमध्ये जोरदार धडक झाली आणि भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, 15 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मॅक्स लोडरमध्ये सुमारे 30 जण होते आणि ते सर्वजण मुकुंद खेडा येथे जवळच्या नातेवाईकाच्या तेराव्यासाठी गेले होते. तेराव्यानंतर सर्वजण खंडौलीजवळील सेवला गावात परतत होते. मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा-अलिगड बायपासवर मीताई गावाजवळ ही दुःखद घटना घडली. मृतांमध्ये महिला आणि पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे. तब्बल 15 जम या अपघातात ठार झाले आहेत.
पोलीस अधीक्षक निपुण अग्रवाल यांनी सांगितलं की, अपघातातील सर्व जखमी सासनीहून खंडौलीकडे जात होते. चालकाला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींपैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
The Prime Minister has announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF for the next of kin of each deceased in the mishap in Hathras, UP. The injured would be given Rs. 50,000. https://t.co/7qucGLR6ug
— PMO India (@PMOIndia) September 6, 2024
पंतप्रधान मोदींकडून घटनेची दखल
उत्तर प्रदेशातील अपघातानं संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण अपघाताची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे. सोशल मीडियावर या घटनेबाबत त्यांनी शोक व्यक्त केला. तसेच, अपघाताबाबत दु:ख व्यक्त केलं. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई देण्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
मॅक्स लोडर आणि रोडवेज बस यांची भीषण टक्कर
जखमींना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना अलीगडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच, जखमींवर उत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस अधीक्षक निपुण अग्रवाल, जिल्हा दंडाधिकारी आशिष कुमार, सीओ हिमांशू माथूर पोलीस दलासह घटनास्थळी उपस्थित आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस जिल्ह्यातील रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रोडवेज बस, पिकअप यांच्यात झालेल्या धडकेत अनेकांचा मृत्यू झालाय
डेथ डीएम आशिष कुमार यांनी सांगितले की, आग्रा-अलिगड राष्ट्रीय महामार्गावर ओव्हरटेक करताना रोडवेज बसने लोडरला धडक दिली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उच्च केंद्रात पाठवण्यात आलं आहे. अपघातात सात पुरुष, चार महिला आणि चार लहान मुलांचा समावेश आहे. यामध्ये दोन भाऊ, आई-मुलगा, पती-पत्नी यांचा मृत्यू झाला आहे.