Haryana Pension : लग्न न झालेल्या पुरुषांना आणि महिलांना मिळणार 2750 रुपयांची मासिक पेन्शन, हरयाणा सरकारची मोठी घोषणा
Manohar Lal Khattar : अविवाहित महिला तसेच पुरुषांना आणि विधुर पुरुषांना आता हरयाणा सरकार पेन्शन देणार आहे.
मुंबई: लग्न न झालेल्यांसाठी हरयाणा सरकारने मोठी घोषणा केली आहे. 45 ते 60 वयोगटातील ज्या पुरुषांचे आणि महिलांचे लग्न झालेलं नाही त्यांना हरयाणा सरकारकडून 2,750 रुपयांची मासिक पेन्शन मिळणार आहे. ज्या अविवाहित पुरुष आणि महिलेचे वार्षिक उत्पन्न हे 1.80 लाखांच्या आत आहे त्यांना या पेन्शनचा लाभ मिळणार आहे.
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज ही घोषणा केली आहे. यासोबत ज्या विधुर पुरुषांचे वय 40 ते 60 आहे आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाखांच्या आत आहे, त्यांनाही 2,750 रुपयांची मासिक पेन्शन देण्याचं सरकारने जाहीर केलं आहे.
मैं घोषणा करता हूं कि हरियाणा के 45 से 60 वर्ष तक की आयु वाले अविवाहित पुरुष व महिलाओं को अब से ₹2,750 मासिक पेंशन दी जाएगी।
— Manohar Lal (@mlkhattar) July 6, 2023
₹1.80 लाख से कम वार्षिक आय वाले व्यक्तियों को इस पेंशन का लाभ मिलेगा।
इसके अलावा 40-60 वर्ष आयु तक के विधुर पुरुष, जिनकी वार्षिक आय ₹3 लाख से कम है… pic.twitter.com/Jwn5fO5sWp
Haryana Pension Benificiary : याचा लाभ कोणाला मिळणार?
हरयाणा राज्य सरकारने सांगितले आहे की ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1.80 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांनाच याचा लाभ मिळेल. ही योजना लागू झाल्यानंतर राज्यातील सुमारे 1.25 लाख लोकांना याचा लाभ मिळणार आहे. यावेळी हरियाणामध्ये वृद्धापकाळ, विधवा निवृत्ती वेतन आणि अपंग निवृत्ती वेतनाची सुविधा दिली जाते. राज्य सरकारने वृद्धापकाळ निवृत्ती वेतन 3000 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.
हरयाणामध्ये येत्या काळात निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमीवर लोकांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.
जमीन नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यामध्ये राज्यातील जमीन नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार असल्याचा महत्तपूर्ण निर्णय झाल्याची त्यांनी माहिती दिली. यामुळे आता जनतेला विनाकारण सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत, त्यांना मनस्ताप होणार नाही असंही ते म्हणाले.
प्रदेशवासियों को दफ्तरों के चक्कर न काटने पड़ें इसके लिए हम लगातार व्यवस्था परिवर्तन करते आए हैं।
— Manohar Lal (@mlkhattar) July 6, 2023
आज इसी कड़ी में हम एक और बड़ा कदम बढ़ाते हुए जमीन की रजिस्ट्री के इंतकाल की प्रक्रिया को ऑनलाइन करने के लिए नए पोर्टल (Automatic Generation of Mutation in WebHalris) का शुभारंभ कर… pic.twitter.com/a0V8uv95Nl
ही बातमी वाचा: