Republic Day 2021 LIVE Updates | शेतकरी आंदोलनात फूट; राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेची आंदोलनातून माघार
Happy Republic Day 2021 Parade Rajpath LIVE Updates: देशभरात आज 72वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. याच निमित्ताने तीन नव्या कृषी कायद्यांचा विरोध करणारे शेतकरी राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीही काढणार आहेत.
LIVE
Background
Republic Day 2021 : संपूर्ण देशभरात आज 72वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधान अंगीकारलं होतं. यामुळे दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. यंदा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी देशाची राजधानी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर परेड काढण्याचाही निर्णय घेतला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात देशाच्या सैन्याची ताकद पाहायला मिळणार आहे. यंदा प्रजासत्ताक दिनी भारतीय हवाई दलात नव्याने सामील झालेली राफेल विमानही परेडमध्ये प्रात्यक्षिके करताना दिसतील. यासोबतच टी-90 टँक आणि सुखोई-30 एमके आय लढाऊ विमानंही या संचलनात सामील असतील.
सरंक्षण मंत्रालयकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राजपथावर 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे रथ पाहायला मिळणार आहेत. याशिवाय सरंक्षण मंत्रालयाच्या सहा रथही यंदा परेडमध्ये असतील. निमलष्करी दलाचे 9 रथ राजपथावर संचलन करतील. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आत्मनिर्भर भारत आणि फिट इंडिया मूव्हमेंटसारख्या अभियानांचे रथही पाहायला मिळतील.
शेतकऱ्यांचीही ट्रॅक्टर रॅली
दुसरीकडे दिल्लीच्या सीमांवर दोन महिन्यांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ट्रॅक्टर मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी नवे तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत.
ट्रॅक्टर मार्चच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजधानीत कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.