एक्स्प्लोर
पंतप्रधान मोदींना रक्ताने चिठ्ठी लिहून हँडबॉल खेळाडूची आत्महत्या

पटियाला : रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांनी केलेल्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत असताना पटियालात मात्र फी नसल्याने एका खेळाडूने आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणीने आत्महत्येपूर्वी पंतप्रधानांना रक्तानं चिठ्ठी लिहिली आहे.
फी नसल्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल खेळाडू असलेल्या 20 वर्षीय पूजाने आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे तिने आत्महत्येपूर्वी पंतप्रधान मोदींना रक्तानं चिठ्ठी लिहून प्रशिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी पूजाला 3 हजार 720 रुपयांची गरज होती. मात्र तितके पैसे तिच्याकडे नसल्यानं प्रशिक्षकानं तिला खोली देण्यास नकार दिला. याच विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचं तिनं चिठ्ठीत लिहिलं.
प्रशिक्षकावर कारवाई करुन आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणीही तिनं पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या चिठ्ठीत केली आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
विश्व
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























