एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vijay Rupani: निवडणूक प्रचारादरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी चक्कर येऊन कोसळले
आपल्या भाषणादरम्यान गुजरातचे (Gujrat) मुख्यमंत्री विजय रुपानींना (Vijay Rupani) चक्कर आली आणि ते बेशुद्धवास्थेत गेले. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे त्यांचा रक्तदाब कमी झाल्याचं सांगण्यात येतंय.
वडोदरा: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना वडोदऱ्यात एका कार्यक्रमादरम्यान चक्कर आली आणि ते बेशुद्ध अवस्थेत गेले. वडोदऱ्यातील निजामपूरा भागातील महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराचे भाषण देत असतानाच मुख्यमंत्र्यांना चक्कर आली. सध्या त्यांची प्रकृत्ती उत्तम असल्याचं सांगण्यात येतंय.
मुख्यमंत्र्यांना जशी चक्कर आली आणि ते खाली पडले तसे त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना सांभाळले. तसेच लागोलाग डॉक्टरांनी त्यांची तब्बेत तपासली. मुख्यमंत्री विजय रुपाणींची तब्बेत गेली दोन दिवस बिघडली होती अशी माहिती आहे.
अतिरिक्त ताणामुळे कमी रक्तदाब
महानगरपालिकेच्या प्रचारासाठी आलेल्या विजय रुपाणींचे भाषण सुरु असतानाच त्यांना चक्कर आली. त्यावेळी ते बेशुद्धावस्थेत गेले. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांची तब्बेत आता ठिक आहे. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे रक्तदाब कमी झाल्याने त्यांना चक्कर आल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. सध्या मुख्यमंत्र्यांना अहमदाबादमधील यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात येत असून त्या ठिकाणी त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहेत.
गुजरातमध्ये यापुढं ड्रॅगन फ्रूटचं नवं नाव असेल 'कमलम'
भाजप नेते भरत डांगर म्हणाले की, 'मुख्यमंत्री विजय रुपाणींची तब्बेत गेली दोन दिवस बिघडली होती. अशाही परिस्थितीत त्यांनी आपला जामनगर आणि वडोदराचा दौरा रद्द केला नाही. त्यामुळे अतिरिक्त ताण आल्याने त्यांना चक्कर आली."
गुजरातमधील अहमदाबाद, वडोदरा, सूरत, राजकोट, जामनगर आणि भावनगर या सहा महापालिका निवडणुकींसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तसेच गुजरातमधील काही नगरपालिका, जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतींसाठी 28 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे.
CAA : मुस्लिमांसाठी जगभरात 150 देश मात्र हिंदूंसाठी फक्त भारतचं, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement