एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुजरात निवडणुकांमधील 10 महत्त्वाचे मुद्दे
गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये चर्चेत राहिलेले काही ठळक मुद्दे
गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणूक 2017 चा निकाल जाहीर होत आहेत. एकूण 182 जागांसाठी गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबरला मतदान पार पडलं. आपलं होमग्राऊंड पंतप्रधान नरेंद्र मोदी राखणार की मोदींचा बालेकिल्ला काँग्रेस भेदणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत.
गुजरात निवडणुकांमधील 10 महत्त्वाचे मुद्दे
1. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी राजकोट पश्चिम मतदारसंघातून विजयी, काँग्रेसच्या इंद्रनील राजगुरुंचा पराभव
2. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल मेहसाना मतदारसंघातून आघाडीवर, काँग्रेसच्या जिवाभाई पटेलांवर वर्चस्व
3. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितु वाघाणी भावनगर मतदारसंघातून विजयी, काँग्रेसच्या दिलीप गोविंद यांना पराभवाची धूळ
4. पाटीदार नेता हार्दिक पटेलच्या सौराष्ट्र-कच्छमध्ये काँग्रेसची मुसंडी, मात्र दक्षिण, मध्य आणि उत्तर गुजरातमध्ये भाजपचं कमळ फुललं
5. दलित नेता जिग्नेश मेवाणी वडगाम मतदारसंघातून विजयी, भाजप उमेदवार पराभूत
6. काँग्रेसच्या तिकीटावर लढणारे ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांचा राधानगर मतदारसंघातून विजय, भाजपचा पराभव
7. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ मणिनगरमध्ये भाजपचे सुरेश पटेल 75 हजारांच्या मताधिक्याने विजय, काँग्रेसच्या श्वेता ब्रम्हभट्टना पराभवाचा धक्का
8. तब्बल पावणे 5 लाख 19 हजार गुजराती मतदारांची ‘नोटा’ पर्यायाला पसंती, एकूण टक्केवारीच्या दोन टक्के मतं ‘यापैकी कोणीही नाही’ला
9. शहरी मतदारांची पसंती भाजपला, 39 पैकी 32 जागांवर भाजप आघाडीवर, तर केवळ सात जागांचे कल कॉंग्रेसच्या बाजूने
10. गेल्या निवडणुकांच्या तुलनेत काँग्रेस फायद्यात, मात्र तब्बल 26 विद्यमान आमदारांची सीट धोक्यात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
Advertisement