एक्स्प्लोर
ओपिनियन पोल : गुजरातमध्ये 'काँटे की टक्कर'
सीएसडीएस आणि एबीपी न्यूजने 23 ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान 50 विधानसभा मतदारसंघातील 200 बुथवर जाऊन 3 हजार 655 लोकांची मतं जाणून घेतली.

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पाच दिवसांवर येऊन ठेपलं आहे. त्याआधी सीएसडीएस आणि एबीपी न्यूजने ओपिनियन पोल घेतला, त्यात गुजरातमध्ये 'काँटे की टक्कर' होणार असल्याचे दिसून येते आहे. ओपिनियन पोलनुसार, गुजरातमध्ये भाजपला 95, काँग्रेसला 82, तर इतरांना 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. त्याआधी गुजरातमधील जनतेचा मूड काय आहे, हे 'सीएसडीएस' आणि 'एबीपी न्यूज'ने जाणून घेतले. कच्छ, सौराष्ट्र, दक्षिण गुजरात, उत्तर गुजरात आणि मध्य गुजरातमध्ये कोणता पक्ष बाजी मारेल, कोण मॅजिक फिगर पार करेल, हे या ओपिनियन पोलमधून जाणून घेता येणार आहे. सीएसडीएस आणि एबीपी न्यूजने 23 ते 30 नोव्हेंबर दरम्यान 50 विधानसभा मतदारसंघातील 200 बुथवर जाऊन 3 हजार 655 लोकांची मतं जाणून घेतली. गुजरात विधानसभा निवडणूक ओपिनियन पोल LIVE UPDATE : पाटीदार समाजात हार्दिक पटेलची लोकप्रियता किती? ऑगस्ट महिन्यात 61 टक्के ऑक्टोबर महिन्यात 64 टक्के नोव्हेंबर महिन्यात 58 टक्के जीएसटीबाबत व्यापारी खुश की नाखुश? खुश - 37 टक्के नाखुश - 44 टक्के कुठला समाज कुणासोबत? पाटीदार - भाजपपेक्षा काँग्रेससोबत 2 टक्के जास्त सवर्ण - काँग्रेसपेक्षा भाजपसोबत 26 टक्के जास्त कोळी - काँग्रेसपेक्षा भाजपसोबत 26 टक्के जास्त दलित - भाजपपेक्षा काँग्रेससोबत 18 टक्के जास्त कुठल्या भागात कुणाला किती पाठिंबा? (विभागनिहाय टक्केवारी) सौराष्ट्र-कच्छ (एकूण जागा- 54) भाजप - 45 टक्के (+3) काँग्रेस - 39 टक्के (-3) उत्तर गुजरात (एकूण जागा - 53) भाजप - 45 टक्के (+1) काँग्रेस - 49 टक्के दक्षिण गुजरात (एकूण जागा - 35) भाजप - 40 टक्के (-11) काँग्रेस - 42 टक्के (+9) मध्य गुजरात (एकूण जागा - 40) भाजप - 41 टक्के काँग्रेस- 40 टक्के गुजरातमध्ये कुणाला किती पाठिंबा? (पक्षनिहाय टक्केवारी) भाजप - 43 टक्के काँग्रेस - 43 टक्के इतर - 14 टक्के गुजरातमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा? (पक्षनिहाय आकडेवारी) भाजप - 95 जागा काँग्रेस - 82 जागा इतर - 5 जागा
आणखी वाचा























