एक्स्प्लोर
Advertisement
अखेर काँग्रेसच्या चाणक्याची बाजी यशस्वी, अहमद पटेल विजयी!
गुजरात राज्यसभेच्या तीनपैकी दोन जागा भाजपने मिळवल्या. तर एका जागेवर काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांनी विजय मिळवला. या निकालानंतरही राज्यसभेतील समीकरणांमध्ये काहीही बदल झालेला नाही. भाजप 58 खासदारांसह सर्वात मोठा पक्ष आहे. तर काँग्रेसचे 57 आमदार आहेत.
गांधीनगर : गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीनपैकी दोन जागा भाजपच्या पदरात पडल्या. तर एका जागेवर काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. भाजपाध्यक्ष अमित शाह पहिल्यांदाच राज्यसभेवर जाणार आहेत. तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही विजय मिळवला.
अमित शाह आणि स्मृती इराणी यांना प्रत्येकी 46 मतं मिळाली. तर अहमद पटेल यांनी 44 आमदारांचा पाठिंबा मिळवला. भाजपचे तिसरे उमेदवार बलवंत सिंह राजपूत यांना 38 मतांवर समाधान मानावं लागलं.
या निकालानंतरही राज्यसभेतील समीकरणांमध्ये काहीही बदल झालेला नाही. भाजप 58 खासदारांसह सर्वात मोठा पक्ष आहे. तर काँग्रेसचे 57 आमदार आहेत.
मध्यरात्री अहमद पटेल यांच्या विजयाची घोषणा
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव आणि काँग्रेसचे चाणक्य समजले जाणारे अहमद पटेल हे पाचव्यांदा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. अहमद पटेल यांचा विजय सोपा नव्हता. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्या विजयावर सस्पेंस कायम होता. या सर्व नाट्यमय घडामोडींनंतर मध्यरात्री दोन वाजता अहमद पटेल यांचा केवळ अर्ध्या मताने विजय झाला.
भाजप आमदाराचं बंड
अहमद पटेल यांच्या या विजयात भाजप आमदार नलिन कोटडिया यांची महत्वाची भूमिका राहिली. नलिन यांनी भाजपला मतदान केलं नसतं, तर अहमद पटेल यांचा विजय अवघड होता. भाजपचाच आमदार फुटल्याने काँग्रेसला मोठा फायदा झाला.
नलिन कोटडिया हे पाटीदार समाजाचे नेते आहेत. आपल्या समाजावर अन्याय झाला आहे. त्यामुळे आपण काँग्रेसला मतदान केल्याचं नलिन यांनी जाहीरपणे सांगितलं.
काँग्रेसचा विजय, भाजपला दणका
भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शाह यांनी अहमद पटेल यांच्या पराभवासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या गोटात सहभागी झाल्याने अहमद पटेल यांच्यावर पराभवाचं सावट होतं. मात्र काँग्रेसच्या दोन आमदारांनी आपण भाजपला मतदान केल्याचं जाहीरपणे सांगितल्याने भाजपच्या हातातून विजय निसटला. निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या दोन्ही आमदारांची मतं बाद ठरवली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement