(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gujarat Election 2022 : रवींद्र जाडेजाच्या बहिणीचा वहिनीवर आरोप, कुटुंबातील राजकीय वादाची चर्चा
Gujarat Election 2022 Rivaba Jadeja vs Naynaba : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या बाजूने आरोप-प्रत्यारोप तीव्र स्वरुपात होताना दिसत आहे.
Gujarat Election 2022 Rivaba Jadeja vs Naynaba : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Election 2022) मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलंय. अशा स्थितीत राजकीय पक्षांच्या बाजूने आरोप-प्रत्यारोप तीव्र स्वरुपात होताना दिसत आहे. गुजरातमध्ये क्रिकेटर रवींद्र जाडेजाची (Ravindra Jadeja) बहीण तसेच काँग्रेसच्या उमेदवार नयनाबा (Nayanaba) यांनी त्यांची वहिनी भाजप उमेदवार रिवाबा जाडेजा (Rivaba Jadeja) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नयना यांनी मंगळवारी सांगितले की, आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी लहान मुलांचा वापर केल्याप्रकरणी रिवाबाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
नणंदचा भावजयवर आरोप
नयनाबा वहिनी रिवाबा यांच्यावर आरोप करताना म्हणाल्या की, रिवाबा सहानुभूती मिळवण्यासाठी लहान मुलांचा वापर करत आहे. एकप्रकारे याला बालमजुरी म्हणतात. काँग्रेस नेत्या नयनाबा यांनी सांगितले की, काँग्रेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. राजकोट पश्चिमचा मतदार विभाग असूनही रिवाबा जामनगर उत्तरमध्ये कशी मते मागू शकतात, असा सवाल काँग्रेस नेत्याने केला.
या जागेवर चुरशीची लढत
नयनाबा म्हणाल्या की, रीवाबाच्या निवडणूक फॉर्ममधील अधिकृत नाव रेवा सिंग हरदेव सिंग सोलंकी आहे. नयनाबाने आरोप केला, “त्याने रवींद्र जडेजाचे नाव कंसात टाकले आहे आणि हे फक्त जडेजा आडनाव वापरण्यासाठी आहे. लग्नाच्या सहा वर्षात तिला नाव बदलायला वेळ मिळाला नाही." दरम्यान, जामनगर उत्तर मतदारसंघात रवींद्र जडेजाच्या कुटुंबातील दोन महिला सदस्य (त्याची पत्नी आणि बहीण) समोरासमोर आल्याने चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे.
रिवाबा जाडेजाच्या विजयाची शक्यता कमी?.
उत्तर जामनगर मतदारसंघात रवींद्र जडेजाच्या कुटुंबातील दोन महिला प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरशीची राजकीय लढत होण्याची शक्यता आहे. भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाची पत्नी भाजपच्या वतीने निवडणूक लढवत आहे, तर त्याची बहीण विरोधी काँग्रेसच्या वतीने उत्तर जामनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. आपल्या विजयाचा दावा करताना, नयनाबा म्हणाल्या की रिवाबा जडेजाच्या जिंकण्याची शक्यता कमी आहे, कारण ती एक सेलिब्रिटी आहे आणि जामनगरच्या लोकांना त्यांच्यासाठी काम करणारा स्थानिक नेता हवा आहे. जामनगर उत्तर ही 89 विधानसभा जागांपैकी एक आहे. या ठिकाणी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी भाजपने विद्यमान आमदार धर्मेंद्र सिंह जडेजा यांच्या जागी रिवाबा जडेजा यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून रिवाबा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Gujarat Election 2022: भाजपसाठी सोपी नाही गुजरात निवडणूक, काँग्रेसला बसणार धक्का; नव्या ओपिनियन पोलचा निष्कर्ष