एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुजरातचा रणसंग्राम : पहिल्या टप्प्यातील 19 जिल्ह्यांमध्ये 68 टक्के मतदान
सलग 22 वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या भाजप आणि पंतप्रधान मोदींसाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. तर लवकरच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या राहुल गांधींसाठीही गुजरातची लढाई ही सोपी नाही.
गांधीनगर : गुजरात विधानसभेच्या पहिल्या 89 जागांसाठी आत मतदार पार पडलं. सायंकाळी पाच वाजता मतदानाची वेळ संपली तोपर्यंत 68 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक 14 डिसेंबर रोजी होणार आहे.
याच 19 जिल्ह्यांमध्ये 2012 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत 70 टक्के मतदान झालं होतं. पहिल्या टप्प्यातील 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी मतदान झालं. 89 जागांसाठी तब्बल 977 उमेदवार रिंगणात आहेत. 2012 साली या 19 जिल्ह्यांमध्ये 70 टक्के मतदान झालं होतं. सर्व पक्षांनी आपापल्या विजयाचा दावा केला आहे.
दरम्यान मतदानानंतर भाजपच्या वतीने अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदारांचे आभार मानले. गुजरातमध्ये भाजपचा मोठा विजय होईल, असा दावाही त्यांनी केला.
मतदानाची टक्केवारी
- कच्छ - 63 टक्के, (2012 साली) 68.25 टक्के
- राजकोट - 70 टक्के, (2012 साली) 71.58 टक्के
- जामनगर - 65 टक्के (2012 साली) 69 टक्के
- गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे राजकोट पश्चिममधून निवडणूक लढवत आहेत. आज सकाळी नऊच्या दरम्यान त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.Cricketer Cheteshwar Pujara casts his vote in Rajkot's Ravi Vidayalaya booth. #GujaratElection2017 pic.twitter.com/NobynWfp6P
— ANI (@ANI) December 9, 2017
गुजरातचा रणसंग्राम : सर्व चॅनल्सचे ओपिनियन पोल एका ठिकाणी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांंधींचं गुजरातमधील मतदारांना आवाहनमतदाताओं की भागीदारी लोकतंत्र की आत्मा होती है। गुजरात चुनाव में पहली बार वोट डाल रहे युवा साथियों का बहुत स्वागत और अभिनन्दन। गुजरात की जनता से अपील है कि भारी संख्या में मतदान कर लोकतंत्र के इस पर्व को सफल बनाएं। — Office of RG (@OfficeOfRG) December 9, 2017- निवडणूक आयोगानं मतदानासाठी संपूर्ण तयारी केली असून मतदान केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली आहे. - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या जनतेला मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. 'आज गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील मतदान आहे. मी सर्व मतदारांना लोकशाहीच्या या सणात सहभागी होण्याचं आणि मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन करतो.' असं ट्वीट मोदींनी केलं आहे.
Phase 1 of Gujarat polls begin. Urging all those voting today to turnout in record numbers and vote. I particularly call upon youngsters to exercise their franchise. — Narendra Modi (@narendramodi) December 9, 2017- पहिल्या टप्प्यात एकूण 89 जागा असून त्यांतील 53 जागा या ग्रामीण भागतील आहेत तर 36 जागा या शहरी भागातील आहे.
ओपिनियन पोल : उत्तर गुजरातमध्ये भाजपला धक्का, कोण बाजी मारणार?
- सध्या ग्रामीण भागातील 53 जागांपैकी भाजपकडे 32 आणि काँग्रेसकडे 17 जागा आहेत. तर शहरी भागातील 36 जागांपैकी भाजपकडे तब्बल 31 आणि काँग्रेसकडे फक्त 5 जागा आहेत. म्हणजेच पहिल्या टप्प्यातील या भागात भाजपचाच दबदबा असल्याचं दिसून येत आहे. मात्र, यंदा मतदारराजा कोणाला कौल देणार हे 18 डिसेंबरलाच स्पष्ट होईल. संबंधित बातम्या : सीडी बनवण्याच्या नादात भाजप जाहीरनामा विसरली : हार्दिक पटेल मोदींना 'नीच' म्हणणाऱ्या मणिशंकर अय्यरांवर काँग्रेसची तात्काळ कारवाई मोदी 'नीच', मणिशंकर अय्यर यांची जीभ घसरली, टीकेनंतर माफीनामा योगी गुजरातमध्ये, मोदी-शाहांची रॅली, प्रचार तोफा थंडावणार गुजरातचा रणसंग्राम : सर्व चॅनल्सचे ओपिनियन पोल एका ठिकाणी गुजरात निवडणुकीवर आतापर्यंत 500 कोटींचा सट्टा, कोण जिंकणार? मी नरेंद्रभाईसारखा नाही, माणूस आहे, चुकतो : राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधींचं गणित चुकलं ओपिनियन पोल : उत्तर गुजरातमध्ये भाजपला धक्का, कोण बाजी मारणार? ओपिनियन पोल : गुजरातमध्ये 'काँटे की टक्कर'अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement