एक्स्प्लोर

कोरोना काळात जीएसटी संकलन पहिल्यांदा 1 लाख कोटींच्या पार, महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक

जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातून ऑक्टोबर 2020 मध्ये 15 हजार 799 कोटींचं जीएसटी संकलन झालं आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये 15 हजार 109 कोटींचं जीएसटी संकलन झालं होतं.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकंटामध्ये डबघाईला आलेला भारतीय अर्थव्यवस्थ हळूहळू पटरीवर येताना दिसत आहे. ऑक्टोबर महिन्यातील वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीच्या आकडेवारीवरुन हे दिसून येत आहे. कोरोना काळात मागील फेब्रुवारी महिन्यापासून जीएसटी संकलन पहिल्यांदा एक लाख कोटींच्या पुढे गेलं आहे. अर्थ मंत्रालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

ऑक्टोबर 2020 मध्ये 1,05,155 कोटी रुपये सकल जीएसटी (वस्‍तु आणि सेवा कर) महसूल संकलन झाले आहे. ज्यात सीजीएसटी 19,193 कोटी रुपये, एसजीएसटी 25,411 कोटी रुपये, आयजीएसटी 52,540 कोटी रुपये (मालाच्या आयातीवर संकलित 23,375 कोटी रुपयांसह ) आणि उपकर (सेस) 8,011 कोटी रुपये (मालाच्या आयातीवर संकलित 932 कोटी रुपयांसह ) समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यासाठी 31 ऑक्टोबर , 2020 पर्यंत दाखल करण्यात आलेल्या जीएसटीआर-3बी विवरणपत्रांची एकूण संख्‍या 80 लाख आहे. जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातून ऑक्टोबर 2020 मध्ये 15 हजार 799 कोटींचं जीएसटी संकलन झालं आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये 15 हजार 109 कोटींचं जीएसटी संकलन झालं होतं.

सरकारने नियमित निपटारा स्वरूपात आयजीएसटीमधून सीजीएसटीसाठी 25,091 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 19,427 कोटी रुपये दिले आहेत. ऑक्टोबर 2020 मध्ये नियमित निपटारा केल्यानंतर केन्‍द्र सरकार आणि राज्‍य सरकारे यांनी मिळवलेला एकूण महसूल सीजीएसटीसाठी 44,285 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 44,839 कोटी रुपये आहे..

या महिन्यात मिळालेला जीएसटी महसूल गेल्या वर्षी याच कालावधीत मिळालेल्या महसुलाच्या तुलनेत 10 टक्के अधिक आहे. या महिन्यात मालाच्या आयातीतून मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 टक्के अधिक होता आणि देशांतर्गत व्यवहारांमधून (सेवांच्या आयातीसह ) प्राप्त महसूल 11 टक्के अधिक होता. जीएसटी महसुलातील वाढ जुलै , ऑगस्ट आणि सप्टेंबर 2020 च्या तुलनेत अनुक्रमे (-)14, -8 आणि 5 टक्के वाढ नोंदली गेली जी अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि महसुलातील वाढ दर्शवते.

गेल्या सहा महिन्यातील जीएसटी संकलन

एप्रिल- 32 हजार 172 कोटी मे - 62 हजार 151 कोटी जून - 90 हजार 917 कोटी जुलै - 87 हजार 422 कोटी ऑगस्ट- 86 हजार 449 कोटी सप्टेबर- 95 हजार 480 कोटी ऑक्टोबर- 1 लाख 5 हजार 155 कोटी

महत्त्वाच्या बातम्या

महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget