एक्स्प्लोर
Advertisement
काय आहे GST विधेयक? जीएसटीबद्दल सर्व काही
मुंबई : बहुप्रतिक्षीत वस्तू आणि सेवा अर्थात जीएसटी विधेयक राज्यसभेत मंजूर झालं आहे. मोदी सरकार यासाठी आग्रही होतं पण काँग्रेसच्या विरोधामुळे हे विधेयक रखडलं होतं. काल राज्यसभेत 203 मतांनी हे विधेयक मंजूर झालं. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यामुळे संपूर्ण देशात एकच करपद्धती लागू होणार आहे.
काय आहे जीएसटी?
जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कर हा संपूर्ण देशभरात लागू केला जाणार असून, व्हॅटसह इतर सर्व कर रद्द होणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या करप्रणालींना पर्याय म्हणून जीएसटीकडे पाहिलं जात आहे. जीएसटी ही भारतातील सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे. या करप्रणालीमुळे करचुकव्यांना चाप बसणार असून राज्य सरकार तसेच सर्वसामान्यांना यामुळे कोणताही त्रास होणार नाही.
या करप्रणालीमुळे सेंट्रल सेल्स टॅक्स, सेवा कर, एक्साइज टॅक्स, लक्झरी टॅक्स, मनोरंजन कर, व्हॅटसारखे सर्व कर रद्द होणार आहेत. ही करप्रणाली लागू झाल्यानंतर केंद्र आणि राज्यसरकारला यातील समान वाटा मिळणार आहे.
विरोधी पक्षाची संमती मिळवण्यासाठी मोदी सरकारने केलेले चार बदल
1) राज्यांतील उद्योगधंद्यांवर 1 टक्का अतिरीक्त कर यापुढे लागणार नाही. जुन्या मसुद्यात राज्यांतील व्यापारावर 3 वर्षांपर्यंत 1 टक्का अतिरिक्त कर लागणार होता.
2) जीएसटीमुळे नुकसान झाल्यास आता 5 वर्षांपर्यंत 100 टक्के भरपाई मिळणार आहे. मूळ विधेयकात 3 वर्षांपर्यंत 100 टक्के, चौथ्या वर्षी 75 तर पाचव्या वर्षी 50 टक्के भरपाईची तरतूद होती.
3) वाद मिटवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यात राज्यांना आपलं मत मांडायला जागा असेल. पूर्वीच्या तरतुदीनुसार दोन तृतीयांश मताधिकार राज्यांकडे तर एक तृतीयांश केंद्राकडे होते.
4) या विधेयकात राज्य आणि सामान्य नागरिकांना कोणतेही नुकसान होणार नाही याबद्दल विश्वास दर्शवणारी तरतूद करण्यात आली आहे.
जीएसटी लागू झाल्यास काय स्वस्त आणि काय महाग?
*जीएसटी लागू झाल्यावर करपद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत. त्यामुळे वस्तूंच्या किमतींवरही प्रभाव पडणार आहे. GST लागू झाल्यावर त्याचा दर 18 टक्के ठेवला जाईल अशी शक्यता आहे.
*डब्बाबंद खाद्यपदार्थ 12 टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतात.
*कपडे, दागिने यांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. यात 12 टक्के कर लावला जाण्याची शक्यता असेल.
*मोबाईल बिल, क्रेडिट कार्डसारख्या सेवाही महाग होतील. कारण जीएसटी एमआरपीवर लावलं जाईल.
*छोट्या कार, एसी, फ्रिज, वॉशिंग मशिन, मायक्रोवेवसारखी उपकरणं स्वस्त होऊ शकतात.
*खाण्यावर लागणारा कर एकच होणार असल्याने त्यातही दर कमी होऊ शकतात.
*मनोरंजन करही जीएसटीमुळे कमी होऊ शकतो.
*उद्योगांनाही 18 टक्के कर भरावा लागणार नाही, तसेच कर भरण्याच्या प्रक्रियेत सुसुत्रता येणार आहे.
दरम्यान राज्यसभेत जीएसटी संमत झाल्यानंतर आज मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाली आहे.
संबंधित बातम्या
GST विधेयक बहूमतांने मंजूर, करप्रणाली सुरळीत होणार
GST आज राज्यसभेत सादर होणार, मोदी सरकारची अग्निपरीक्षा
जीएसटीमुळे 'बाय वन गेट वन फ्री'ला चाप?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement