एक्स्प्लोर
चालत्या ट्रेनमध्ये जीआरपी शिपायाचा आजारी महिलेवर बलात्कार
लखनौ : उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये एक आजारी महिला प्रवाशावर बलात्कार केल्याची घटना समोर आली. ट्रेनमध्ये तैनात असलेल्या मुराबादमधील जीआरपी शिपायावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.
चंदीगड-लखनौ एक्स्प्रेसमधून चांदपूरहून बिजनोरला येताना मंगळवारी ही घटना घडली. जीआरपी शिपायाला निलंबित केलं असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिस अधीक्षकांच्या माहितीनुसार, "27 वर्षीय पीडित महिला मूळची मेरठची आहे. दोन दिवसांपूर्वी औषध आणण्यासाठी ती लखनौ गेली होती. तिथून परतताना ती चुकीच्या ट्रेनमध्ये चढली. सुरुवातीला ती जनरल डब्ब्यात बसली. त्याच डब्ब्यात असलेल्या कमल शुक्लाने तिला अपंगांसाठी राखीव डब्ब्यात जाण्यास सांगितंल. ट्रेन सकाळी 8 वाजता चांदपूर स्टेशनवर पोहोचल्यानंतर शुक्ला तिला त्या डब्ब्यात घेऊन गेला. तिथे आधीच तीन तरुण बसले होते. यानंतर शिपायाने तिघांना दुसऱ्या डब्ब्यात जाण्यास सांगितलं. हे तरुण गेल्यानंतर शुक्लाने डब्बा बंद करुन घेतला. यानंतर त्याने बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला."
परंतु ट्रेन सकाळी 9 वाजता बिजनोर स्टेशनमध्ये पोहोचताच, डब्ब्या बाहेर असलेल्या तिन्ही तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शिपायाने महिलेला आत डाबल्याचा आरोप तरुणांनी केला. यानंतर इतर प्रवासी आणि कर्मचारी या डब्ब्याबाहेर जमा झाले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
यानंतर शुक्लाने दरवाजा उघडला. त्यावेळी महिला बेशुद्ध अवस्थेत पडली होती. जमावाने शिपाई कमल शुक्ला पकडून त्याला जबर मारहाण केली आणि पोलिसांकडे सोपवलं. तर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
महिलेच्या तक्रारीनंतर रेल्वे पोलिसांनी आरोपी शिपायाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. महिलेची वैद्यकीय चाचणी सुरु असून पोलिस तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement