एक्स्प्लोर
Advertisement
VIDEO : …जेव्हा भर लग्नमंडपात फेरे घेताना नवरदेवाच्या पायजम्याची नाडी सुटली!
नवी दिल्ली : प्रत्येकजण लग्न सोहळ्यातील हर एक क्षण जपून ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. आता तर प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करुन ठेवणंही सोपं झालं आहे. यातील प्रत्येक क्षण आठवणींच्या गाठोड्यात साठवून ठेवता यावं, हा यामागील उद्देश असतो. मात्र, एखादा हास्यस्पद क्षण असेल तर? असाच एक क्षण पंजाबी कुटुंबात घडला आहे, जो सगळ्यांच्याच लक्षात राहील.
भर लग्नमंडपात फेरे घेताना नवरदेवाच्या पायजम्याची नाडीच सुटली. विशेष म्हणजे हा सारा प्रकार कॅमेऱ्यात कैदही झाला आहे. आता कॅमेऱ्यात कैद झाला म्हटल्यावर तो बंदिस्त कसा राहणार? व्हिडीओ कुणीतरी यू ट्युबवर अपलोड केला आणि बघता बघता व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
व्हिडीओ पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल, नवरदेव-नवरी फेरे घालत असताना अचानक नवरदेवाच्या पायदजम्याची नाडी सुटते आणि मग मोठा गोंधळ उडतो. मग त्याचा पायजमा सांभाळण्यासाठीची धावपळ, उपस्थितांमध्ये हशा आणि खूप काही.
मग थोड्याच वेळात नवरदेवाची आई पुढे येऊन पायजमा सांभाळण्याचा प्रयत्न करते. असो. पण जे काही झालं, ते या जोडप्याच्या आयुष्यातील भन्नाट क्षण ठरणार आहे. किंबहुना, उपस्थित नातेवाईकांना या दोघांचं लग्न कायम लक्षात राहील. मग ते सुटलेल्या नाडीमुळे का असेना!
पाहा व्हिडीओ:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement