एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पॅन कार्ड 'आधार'शी लिंक करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
त्यामुळे जर तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलं नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. चार महिन्यांमध्ये पॅन कार्ड आधारशी लिंक करा.
नवी दिल्ली : पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आणखी चार महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. केंद्र सरकारने ही डेडलाईन 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. आयकर विभाग आज या संदर्भातील परिपत्रक जारी करणार आहे.
खरंतर पॅन कार्ड हे आधार कार्डाशी लिंक करण्याचा आज (31 ऑगस्ट) शेवटचा होता. आज ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर पॅन कार्ड रद्द होण्याची शक्यता होती. परंतु केंद्र सरकारने आता चार महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
त्यामुळे जर तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलं नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. चार महिन्यांमध्ये पॅन कार्ड आधारशी लिंक करा.
पॅन-आधार लिंक न केल्यास काय होईल?
तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलं नसेल, तर तुमचा पगारही रोखला जाऊ शकतो. कंपन्या करमर्यादेवर असलेल्या पगारावरील टीडीएस कापून घेतात. मात्र तुमच्याकडील पॅन क्रमांक रद्द झाल्यास कंपनीला तसं करता येणार नाही.
पॅन कार्ड 'आधार'शी लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस
पॅन आणि आधार लिंक न केल्यास तुमचं पॅन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. रद्द झालेल्या पॅन कार्ड नंबरने तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केला, तर तोही मान्य होणार नाही. त्यामुळे अनेक आर्थिक कामांमध्ये अडथळा येऊ शकतो. पॅनकार्ड रद्द झाल्यास तुम्हाला पुन्हा नव्याने पॅनकार्ड काढावं लागेल.
पॅन आधारशी लिंक असल्याचे फायदे
जर तुमचा पॅन क्रमांक आधार कार्डाशी लिंक असेल, तर तुम्हाला नवीन बँक खातं सहज उघडता येईल. तुम्हाला आयटीआर भरतानाही कोणती अडचण येणार नाही.
तुम्ही जर गुंतवणुकीच्या दृष्टीने शेअर बाजाराचा विचार करत असाल तर कुठल्याही म्युच्युअल फंडाचे युनिट खरेदीसाठी आणि डीमॅट अकाऊंट ओपन करणं सोपं जाईल. नवीन डेबिट अथवा क्रेडिट कार्ड घेणंही सोयीचे ठरणार आहे.
ज्यांच्याकडे आधार नाही
ज्यांच्याकडे आधार कार्डच नाही, त्यांचं पॅनकार्ड रद्द करु नये, असे आदेश नुकतंच सुप्रीम कोर्टाने आयकर विभागाला दिले आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे आधार नाही त्यांना काहीसा दिलासा आहे, मात्र सध्या तरी आधार कार्ड नसलेल्या लोकांची संख्या तुलनेने कमी आहे.
आधार कार्ड पॅनसोबत कसं लिंक कराल?
पॅनकार्ड लिंक करण्यासाठी असा करा एसएमएस:
आयकर विभागकडून वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत पॅन कार्ड आधारकार्डशी कसं लिंक करावं हे सांगण्यात आलं आहे. असं करण्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या मोबाइल क्रमांकावरुन 567678 किंवा 56161 या क्रमांकावर मेसेज करायचा आहे.
UIDPAN (स्पेस) तुमचा आधार नंबर (स्पेस) तुमचा पॅनकार्ड नंबर असा SMS या 567678 किंवा 56161 नंबरवर करा.
आधार कार्ड पॅनसोबत कसं लिंक कराल?
आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेलं नाव टाकावं लागेल.
वरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून ‘लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर लगेच तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक होईल.
दरम्यान आधार कार्ड आणि पॅनवर असणारी जन्म तारीख एक असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
क्राईम
निवडणूक
Advertisement