एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाकिस्तानातील हिंदूंना आता भारतात संपत्ती खरेदीची संमती
नवी दिल्ली : पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना म्हणजेच हिंदूना आता भारतात संपत्ती खरेदी करता येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानमधील हिंदूंना पॅनकार्ड आणि आधारकार्डाचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या नागरिकांची संख्या तब्बल 2 लाख इतकी आहे. यामध्ये बहुतांश हिंदू आणि शीख नागरिकांचा समावेश आहे. यापैकी 400 पाकिस्तानी हिंदू सध्या भारतातील जोधपूर, जैसलमेर, जयपूर, रायपूर यासारख्या शहरांमध्ये वास्तव्याला आहेत.
व्हिसावर भारतात राहणाऱ्या या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. त्यांच्या समस्यांचा विचार करता सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement